Pune News : फ्लेक्सवरील कारवाई थांबविण्यासाठी कर्मचाऱ्यांनेच दिला अतिरिक्त आयुक्तांचा नंबर

नागरिकांनी अतिक्रमण, अवैध बांधकाम, फ्लेक्सची तक्रार महापालिकेकडे करावी, त्यांची नावे गोपनीय ठेवले जातील असे महापालिका प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal
Updated on

पुणे - नागरिकांनी अतिक्रमण, अवैध बांधकाम, फ्लेक्सची तक्रार महापालिकेकडे करावी, त्यांची नावे गोपनीय ठेवले जातील असे महापालिका प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते. मात्र, आकाश चिन्ह विभागाच्या एका कर्मचाऱ्याने फ्लेक्सवरील कारवाई थांबविण्यासाठी फ्लेक्स लावणार्याला थेट अतिरिक्त आयुक्तांचा मोबाईल क्रमांक दिला असल्याचा कर्मचार्याची बेफिकीरी समोर आली आहे.

पुणे महापालिकेच्या एका अतिरिक्त आयुक्तांनी सिंहगड रस्त्या परिसरातील रस्ते, तेथील अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स आणि लायगुडे दवाखान्याची नुकतीच पाहणी केली. सिंहगड रस्त्यावर चौकाचौकांमध्ये अनधिकृत फ्लेक्स दिसून आल्याने त्यावर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी आकाश चिन्ह विभागाच्या कर्मचाऱ्याला दिले.

त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली एका ठिकाणी फ्लेक्स लावणाऱ्या नागरिकाने कारवाई करू नका असे संबंधित कर्मचाऱ्याला सांगितले. त्यावर तुम्हाला जर कारवाई थांबवायची असेल तर अतिरिक्त आयुक्तांशी बोलून मुदत घ्या असे सांगत मोबाईल क्रमांक दिला. त्या नागरिकाने थेट अतिरिक्त आयुक्तांना फोन करून 'माझ्या फ्लेक्स वर कारवाई करू नका' अशी मागणी केली.

अतिरिक्त आयुक्तांनी त्याच्याकडे चौकशी केली असता 'तुमच्याच कर्मचाऱ्यांनी मला हा नंबर दिला' असेही त्यांनी सांगितले. या प्रकारानंतर प्रशासनामध्ये एकच उडाली आहे संबंधित अतिरिक्ततांनी त्या कर्मचाऱ्यावर योग्य ते कारवाई केली जाईल असे सांगितले.

नागरिकांच्या सुरक्षेचे काय?

शहरातील अवैध बांधकामे, अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग यावर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी तक्रारी कराव्यात असे आवाहन केले जाते. नुकतेच निवासी मिळकतींमध्ये व्यावसायिक वापर सुरू असेल तर त्यासाठीची ही तक्रार करण्यासाठी एक वाॅट्सअप क्रमांक प्रशासनाने सुरू केलेला आहे. अशी तक्रार करणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवले जाईल असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जातो.

मात्र, प्रत्यक्षात नागरिकांची नावे व त्यांचा मोबाईल क्रमांक ज्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे त्यांना सर्रासपणे देत गोपनीयतेकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे तक्रारदार नागरिक अडचणी येतात. आता मात्र थेट अतिरिक्त आयुक्तांचे नाव गोपनीय न ठेवता ते उघड केले. अधिकार्यांची ही स्थिती असेल तर सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

'अनधिकृत फ्लेक्स वरील कारवाई थांबविण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांचा मोबाईल क्रमांक लावला देणे हे गंभीर आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल. तसेच नागरिकांची नावे गोपनीय राहावीत याबाबत देखील काळजी घेऊ.'

- माधव जगताप, उपायुक्त, आकाशचिन्ह विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.