कोथरूड - महात्मा गांधी हे केवळ एक व्यक्ति नसून तो एक प्रत्यक्ष विचार आहे. गांधी विचार संपवता येणार नाहीत. ग्रामस्वराज्याचा विचार गांधीजींनी मांडला. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या मूळ हेतूने राजीव गांधी यांनी पंचायत राज संघटन मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला. पण तो त्यांच्या कार्यकाळात पूर्ण होऊ शकला नाही, त्यांच्या मागे पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळात 73 व 74 व्या घटना बदल करून पंचायत राज संघटन मजबूत करण्यात आले, असे प्रतिपादन मध्यप्रदेश माजी मुख्यमंत्री ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केले.
राजीव गांधी पंचायत राज संघटन अंतर्गत दोन दिवसीय सर्वोदय संकल्प शिबीर गांधी भवन कोथरूड येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना दिग्विजय सिंह बोलत होते. रमेश बागवे, मोहन जोशी, अभय छाजेड, संजय ठाकरे, अनिल पाटील, पूजा आनंद, रजनी त्रिभुवन, राजीव गांधी पंचायत राज संघटन महाराष्ट्र प्रभारी नारायण सिंह राठोड यावेळी उपस्थित होते.
दिग्विजय सिंह म्हणले की, मूळ सनातन धर्माचे प्रमुख उद्दिष्ट हे सहिष्णुता आणि सर्व धर्म समभाव हा आहे. मानवता हे सर्व धर्मांचे मुळ आहे. राष्ट्रीय स्वयं सेवक संघ व एम आय एम या दोन्ही धर्माध शक्ति विरुद्ध मी नेहमी प्रखर पणे विरोध करत असतो, या कारणाने माझ्या वर ह्या दोन्ही संघटना कडून खटले देखील दाखल करण्यात आले आहेत आणि त्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे. मी दहा वर्ष मुख्यमंत्री होतो, आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या राज्यात कोणतीही अघटित कृती होऊ न देता आर एस एस आणि तिरस्करणीय वृत्ती विरुद्ध दोन हात केले.
सर्वोदय संकल्प शिबिरात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी मार्गदर्शन केले. शिबिराची सुरुवात माडगूळकर गुरुजी यांच्या हस्ते झाली. मोहन जोशी व कोथरूड ब्लॉक अध्यक्ष विजय खळदकर यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अँड. अश्विनी गवारे यांनी प्रास्ताविक यशराज पारखी यांनी केले. किशोर मारणे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.