राष्ट्रवादी पुन्हा! विरोधकांना चितपट करत दिलीप मोहितेंचा दणदणीत विजय; खेड बाजार समितीवर पुन्हा झेंडा APMC Election 2023

APMC Election 2023
APMC Election 2023esakal
Updated on

राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच पार पडली. यापैकी काही बाजार समित्यांचे निकाल आज (शनिवारी) जाहीर होणार आहेत.

APMC Election 2023
APMC Election 2023: प्रतिष्ठेच्या लढाईत विखे पाटीलांना मोठा धक्का; राहुरी बाजार समितीत पुन्हा तनपुरेंची सत्ता

पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती.

शनिवारी पार पडलेल्या निवडणुकीत तब्बल ९९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण ३८९६ मतदारांपैकी ३८३९ मतदारांनी मतदान केले. या ठिकाणी राष्ट्रवादी विरूद्ध सर्व पक्षीय अशी लढत झाली. तरी देखील या निवडणुकीत राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे.

APMC Election 2023
Jitendra Awhad: “निरंजन डावखरेंनी मुस्लीम भगिनीशी…”, लव्ह जिहादच्या बॅनरवरून आव्हाडांची प्रतिक्रिया

यामध्ये राष्ट्रवादीला 10, ठाकरे गटाला 3, भाजपला 2, काँग्रेसला 1 जागेवर यश मिळालं आहे. तर व्यापारी मतदारसंघातील 2 अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी तालुक्यातील ७ ठिकाणी १७ मतदान केंद्रावर मतदान पार पडलं.

बाजार समितीची निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. तब्बल ९८.५४ टक्के मतदान झाले.

सकाळासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाली होती. खेड तालुक्यातील राजगुरुनगर,चाकण, वाडा, शेलपिंपळगाव, कनेरसर, पाईट आणि आंबोली अशी सात मतदान केंद्रे होती.

राजगुरुनगर येथे कृषी पतसंस्था व ग्रामपंचायत मतदारसंघांबरोबरच आडते व्यापारी व हमाल तोलारी मतदारसंघातीलही मतदान होते. त्यामुळे बहुतेक उमेदवार राजगुरुनगर येथील मतदान केंद्राबाहेर थांबले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.