जावेदने याच बॅटने भारताला हरवले असं सांगत १५ बॅट विकल्या, वेंगसरकरांनी सांगितला किस्सा

युपीतील एक छोटा मुलगा एका हातात सुटकेस आणि दुस-या हातात कीट घेवून आझाद मैदानावर आला...
Dilip Vengsarkar share story of Javed Miandad beat india sold 15 bats kothrud
Dilip Vengsarkar share story of Javed Miandad beat india sold 15 bats kothrud sakal
Updated on

कोथरुड : युपीतील एक छोटा मुलगा एका हातात सुटकेस आणि दुस-या हातात कीट घेवून आझाद मैदानावर आला. ज्याला राहण्याचा वा खेळण्याचा कुठलाही ठावठिकाणा माहित नव्हता. त्या मुलाने मेहनतीच्या बळावर क्रिकेटमध्ये यश मिळवले. एवढेच नव्हे तर मुंबईत स्वतःचे घर देखिल घेतले. यशस्वी जैस्वाल या युवा क्रिकेटपटू विषयी सांगत दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले की, मेहनत घेणारा नक्कीच यशस्वी होतो. गुंजाळ स्पोर्टस अकादमीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिलीप वेंगसरकर बोलत होते. याच कार्यक्रमात वेंगसरकर यांनी जावेद मियाँदाद यांचा एक किस्सा सांगताच सभागृहात हशा पिकला.

एअर चीफ मार्शल भूषण गोखले, क्रिकेटपटू द्वारकानाथ संझगिरी, अन्वर शेख, मिलिंद गुंजाळ यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. व्यासपीठावर रंगलेल्या प्रश्नोत्तररुपी चर्चेतून क्रिकेटविश्वातले विविध किस्से ऐकायला मिळाल्याने श्रोते मुग्ध झाले होते. वेंगसरकर म्हणाले की, आझाद मैदानावर २२ तंबू होते. त्यातील एका माळ्याने त्याला आधार दिला. नंतर त्याने शिक्षण घेतले. मला लोकांनी जैस्वाल बद्दल सांगितले. मी त्याला इंग्लडला घेवून गेलो. त्याने प्रत्येक मॅचमध्ये

चांगले रन केले. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयलतर्फे खेळला. त्याची ही कहाणी मी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना सांगितली. त्याच्यावर चित्रपट काढला तर तो सुध्दा यशस्वी होईल. याप्रसंगी सायकलपटू व जलतरण पटू असलेले खेळाडू अमोल आढाव यांना पंचवीस हजार रुपये, मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. प्रास्तविक मिलिंद गुंजाळ यांनी केले. निवेदन मुग्धा गोडबोले यांनी केले.

जावेद हुशार होता, वेगसरकरांनी सांगितलेला किस्सा

एकदा शारजहाला आमचा १२५ ला ऑलआऊट झाला. आम्ही पाकिस्तानचा ८८ मध्ये ऑलआऊट केला. त्यानंतर त्यांचे खेळाडू दोन दिवस हॉटेललाच बसून होते. जावेद म्हणाला, आम्ही घरी गेलो तर लोक मारतील आम्हाला. नंतर १९८६ साली आम्ही २५० धावा केल्या. त्यावेळी ती मोठी धावसंख्या होती. सुनिल गावसकर व मी १५० धावांची भागीदारी केली होती. १८० धावावर त्यांचे ८ गडी बाद झाले होते. आम्ही आरामात जिंकू असे वाटत होते. जावेदने एक- दोन धावा घेत शेवटच्या बॉलला विजयी फटका मारला. सगळे प्रेक्षक जोरात नाचत होते. अर्धातास आम्ही सगळे मैदानात बसून होतो. जावेद हुशार होता. त्याने तेथे १५ बॅट विकत घेतल्या. नंतर तो त्या बॅट घेवून आबुधाबी, कुवेत, कतार आदी भागात फिरत होता. या बॅटने मी षटकार मारला असे सांगत त्याने प्रत्येक बॅट दहा हजार डॉलरला विकली. तो खेळाडू इतकाच चांगला व्यावसायिक होता. वेंगसरकरांनी सांगितलेल्या या किस्स्यावर सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()