मंचर : “राज्य सरकारमध्ये मी, अजित पवार व काही सहकारी सहभागी झालो. याचा अर्थ भारतीय जनता पक्षात गेलो. असे अजिबात नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरच आहोत. ‘ईडी, सीबीआय इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यामुळे राज्य सरकारमध्ये सहभागी झाले’ असा अपप्रचार केला जात आहे.
पण त्यात अजिबात तथ्य नाही. कुठल्याही प्रकारची नोटीस कोणाला सापडली तर घेऊन या. लगेच आमदारकीचा राजीनामा देईल.” असे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. मंचर (ता.आंबेगाव) येथे शरद पवार सभागृहात रविवारी (ता.२०) झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वळसे पाटील बोलत होते.
अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर होते. यावेळी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, आदिवासी समाजाचे नेते सुभाष मोरमारे, विवेक वळसे पाटील, वसंतराव भालेराव, बाळासाहेब बेंडे, अँड.प्रदीप वळसे पाटील, सचिन भोर, सुषमा शिंदे, राधेश्याम शिंदे, सचिन पानसरे, ज्ञानेश्वर घोडेकर उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील यांना दोन वेळा बोलताना गहिवरून आले ते म्हणाले “आत्तापर्यंत मी कधीही कोणाबद्दल वाईट बोललो नाही.जेष्ठ नेते शरद पवार यांच्या कृपेने गेली ३२ वर्ष सलग आमदार व अनेक मंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. मांजरी येथे वसंतदादा शुगर कार्यक्रमात पवार साहेब यांच्यासमवेत बराच वेळ होतो. साखर उद्योगाविषयी सकारात्मक चर्चा झाली.
पण एका महाशयाने पोस्ट टाकली की वळसे पाटील यांच्या शेजारी पवार साहेब बसले पण त्यांच्याकडे पवार साहेब यांनी पाहिले सुद्धा नाही. अफवा पसरून भ्रम निर्माण करणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी सौम्य भाषेत उत्तर देण्याचे काम करावे. देवदत्त निकम यांना दहा वर्ष भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्षपद दिले.
नंतर बाजार समितीचे सभापती पद दिले. पक्षाच्या नावाने कुंकू लाऊन फिरायचे. गावागावात गटतट निर्माण करून भांडणे लावायची. हे प्रकार सुरु होते. त्यामुळेच बाजार समितीला वसंतराव भालेराव यांना संधी दिली आहे. बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीत कोणी कोणाला आतून मदत केली याबाबत महिती प्राप्त झाली आहे.यापुढे ज्यांना राहायचं त्यांनी आनंदाने रहा. ज्यांना जायचं त्यांनी गेले तरी चालेल.”
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सभासद असल्याची पाच हजार प्रतिज्ञा पत्र तयार करावीत.” असे गारटकर यांनी सांगितले. “हुतात्मा बाबू गेनू जलाशयाला (डिंभे धरण) बोगदा पाडून अन्य भागात पाणी नेण्याचा प्रयत्न आहे. तसे झाल्यास घोड व मीना नदीवरील बंधारे फक्त पडणाऱ्या पावसावरच भरता येतील.
बंधार्यांना धरणातून पाणी मिळणार नाही. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पारनेर या तालुक्यात पुन्हा १९७२ सारखी भयानक परस्थिती निर्माण होईल. पाणी पळविण्याच्या प्रयत्नाला माझा आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत विरोध राहील.मतदार संघातील जनतेच्या हितासाठी व विकास कामांसाठीच योग्य निर्णय घेतला आहे.”
- दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.