आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आठव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना या निवडणुकीत आवाहन देण्यासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, राजाराम बाणखेले, बांधकाम व्यावसायिक रमेश येवले यांनी मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीकडून वळसे पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. पण महाविकास आघाडी कोणाला हिरवा कंदील देणार? ही जागा कोणाच्या वाट्याला येणार? यावर निवडणुकीचे बरेच काही गणित अवलंबून आहे.