Dilip Walse Patil: "बिनधास्त निवडणूक लढवा,माझा त्याला विरोध नाही परंतु..." वळसे पाटलांचा टोला कोणाला ?

Dilip Walse Patil: तुम्ही बिनधास्त निवडणूक लढवा,माझा त्याला विरोध नाही परंतु आपली बदललेली भाषा जरा तपासून पहा असा टोला राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांचे नाव न घेता लगावला.
Dilip Walse Patil
Dilip Walse Patil
Updated on

निरगुडसर ता. भीमाशंकर कारखाना,बाजार समितीवर यापूर्वी काहीना काम करण्याची संधी दिली,आता त्यांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत तुम्ही बिनधास्त निवडणूक लढवा,माझा त्याला विरोध नाही परंतु आपली बदललेली भाषा जरा तपासून पहा असा टोला राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांचे नाव न घेता लगावला.सलग सात वेळा तुमच्यासह तालुक्यातील सर्व जनतेने मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली,विविध खात्यांची मंत्रीपदे देखील मला मिळाली,परंतू मिळालेल्या पदांचा उपयोग मी सर्वसामान्यांच्या विकासासाठीच केला.

Dilip Walse Patil
Dilip Valse Patil: ‘ती विधानसभा निवडणूक लढविणार नाही..’ दिलीप वळसे पाटील यांनी लेकीबद्दल केला खुलासा

वळती (ता. आंबेगाव ) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव शिरूर आयोजित महायुती सहविचार मेळाव्यात मार्गदर्शन करताना मंत्री वळसे पाटील बोलत होते .यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे,भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,शिवाजीराव लोंढे,बारकू बेनके,किसन लोखंडे,मनोहर शेळके,अजय आवटे,रमेश खिलारी, सुषमा शिंदे,दादाभाऊ पोखरकर,रवींद्र करंजखेले,सुनील बाणखेले,शिवाजी राजगुरु,सचिन भोर,नितीन वाव्हळ आदी मान्यवर उपस्थित होते .

मंत्री वळसे पाटील पुढे म्हणाले "सध्याचे सरकार सर्वसामान्यांसाठी चांगले निर्णय घेत असून लाडकी बहीण योजना मोफत वीज,जेष्ठांसाठी योजना सुरु केल्या आहेत आता या पुढील काळात राज्यातील मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळणार आहे.या पुढील काळात पाण्याविषयी मोठा संघर्ष होणार असून काही लोकांचा डिंभे धरणाला बोगदा पाडून त्याचे पाणी माणिकडोह धरणात नेऊन पुढे ते नगर जिल्ह्यात नेण्याचा डाव आहे त्यामुळे पुन्हा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते . परंतू हे मी कदापी होऊ देणार नाही यासाठीच मध्यंतरीच्या काळात मला काही राजकीय निर्णय घ्यावे लागले.

प्रास्ताविकमध्ये शिवाजीराव लोंढे म्हणाले वळती गाव आणि वळसे पाटील कुटूंबियांचे गेली ५० वर्षापासून स्नेहाचे संबंध आहे गावाने यापूर्वी माजी आमदार स्व.दत्तात्रय वळसे पाटील यांच्या विचारांना साथ दिली त्यानंतर गेली ३५ वर्षे दिलीप वळसे पाटील यांच्या पाठीशी वळती गाव भक्कम उभे राहीले आहे.वळसे पाटील यांनीच तालुक्याचे नेतृत्व करावे अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.

कार्यक्रमाचे नियोजन शिवाजीराव लोंढे मित्र मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश पडवळ, अनिल वाजे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.