सासवड : आधीच कोरोनाचा कहर आता पाणीसंकट

आता दोन दिवसाआड नळाद्वारे होणार पाणीपुरवठा.
saswad
saswadSakal Media
Updated on

सासवड ः येथे सासवड (ता. पुरंदर) शहरात पाणीटंचाईने आणखी तीव्र स्वरुप धारण केले असून नगरपालिकेकडून मिळणाऱया पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आता दर दोन दिवसाआड केला आहे. अगोदरच नळाद्वारे मिळणारे दिवसाआड पाणी कित्येक नागरीकांना नीटसे मिळत नसताना आता हे आणखी संकट तीव्र झाले आहे. त्यामुळे सतत दोन वर्षे अतिवृष्टी होऊन ग्रामीण भागात टँकर हटले, मात्र सासवड शहरात कित्येक कुटुंबे टँकरग्रस्त झाल्याचे यानिमित्ताने पाहण्यास मिळत आहे. हा पाणीटंचाईचा संसर्ग वाढतच आहे.

saswad
पुणे : ग्रामीण प्रशासनाने कोविडबाबत सतर्क रहावे : गृहमंत्री

सुमारे 60 हजार लोकसंख्या असलेल्या सासवड शहरास रोज 60 लाख लिटर्स पाणी लागते. मात्र गेली अनेक वर्षे जानेवारीपासून दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे अंगवळणी पडले आहे. त्यातच यंदा परवापासून गराडे जलाशयातून होणारा रोजचा 10 लाख लिटर्सचा पाणी पुरवठा जलाशय आटल्याने बंद झाला. त्य़ाशिवाय घोरवडी जलाशयाच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु असल्याने तिकडून येणारे सुमारे 10 लिटर्स पाणी पुरवठा बंद आहे. वीर धरणाहून सुमारे 55 लाख लिटर्स पाणी येते. परंतु, वळवाच्या पावसाने वारे, वादळ, पाऊस आणि त्याच्या परीणामातून वीज पुरवठा खंडीत होण्याने वीर धरणातून सासवडसाठी 30 ते 40 लाख लिटर्सच पाणी येते. सासवड नगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता रामानंद कळस्कर म्हणाले., स्त्रोतातून येणारे पाणी अपुरे असल्याने लोकांना आशेला लावून ठेवण्यापेक्षा दिवसाआड एेवजी दोन दिवसाआड पाणी पुरवठा नळद्वारे करुन थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. अगोदर तासभर दिवसाआड पाणी दिले जात होते. त्याएेवजी दोन दिवसाआड सव्वा ते दिडतास नळाद्वारे पाणी देण्याचा आता प्रयत्न राहील. यात योग्य दाबाने पाणी मिळाल्यास अधिकाधिक लोकांना नळाद्वारे पाणी मिळेल, असे वाटते. दरम्यान पाणीटंचाईच्या झळा ज्या नागरीकांना बसत आहेत, त्यांच्या प्रतिक्रीया खुप संतप्त आहेत.

saswad
कोरोना झाला की सर्व संपले असे नाही; रुग्णालयाचा अट्टाहास सोडा

घोरवडी जलाशयाच्या जलवाहिनेचे चार कि.मी. अंतरात दुरुस्तीचे काम सुरु आहे. ते मध्यंतरी ठेकेदारासह तीनजण कोरोना पाॅझिटिव्ह झाल्याने बंद पडले. ठेकेदार व्हेंटीलेटरवर आहे. त्यामुळे आता कुठे दुसरी पर्यायी व्यवस्था करुन काम आठवडेभरात पूर्ण करु. घोरवडीतून सुमारे 10 लिटर्स पाणी महिन्यापूर्वी मिळायचे, ते बंद आहे. पण काम होताच, एक आठवड्यात तिकडून 25 लाख लिटर्स पाणी मिळेल. त्यातून सासवडची टंचाई बऱयापैकी कमी होऊन दिलासा मिळेल.

- रामानंद कळस्कर, अभियंता, पाणी पुरवठा विभाग सासवड नगरपालिका

पाणी टंचाई असल्याने आपल्या नळाला पाणी न आळ्याने सोसायटीत ज्याच्या नळाद्वारे पाणी येईल तिकडे महिला हंडे घेऊन जातात. भरलेले हंडे उचलून आणायचे असतात, त्यामुळे चार घरच्या महिलांना मास्क नसते. त्यातून माझ्या बिल्डींगमध्ये अनेक महिला व कुटुंबे कोरोना पाॅझिटिव्ह झाली. अनेक टंचाईग्रस्त लोकवस्तीत हा कळीचा प्रश्न आहे. नगरपालिकेने हा मुद्दा लक्षात घ्यावा.

- विजय मोरे, एसटी बसस्थानकामागे, सासवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.