देशात नऊ महिने ठरले नैसर्गिक आपत्तीचे!

अडीच हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू; ‘सीएसई’चा अहवाला प्रसिद्ध
disaster management Nine months of natural disaster Report of CSE pune
disaster management Nine months of natural disaster Report of CSE puneesakal
Updated on

पुणे : देशात या वर्षी अनेक नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्या. यंदा १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीत २७३ पैकी २४२ दिवसांमध्ये नैसर्गिक आपत्ती उद्‍भवल्या आहेत. त्यामुळे देशाचे नऊ महिने हे आपत्तीचेच ठरले असून या काळात अडीच हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची बाब नुकतीच सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या (सीएसई) अहवालातून समोर आली आहे.

सीएसईच्या वतीने जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान उद्‍भवलेल्या नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करत ‘लॉस अँड डॅमेज’ हा अहवाल सादर केला आहे. यामध्ये थंडीची लाट, वादळ, वीज पडणे, अतिवृष्टी, पूर, उष्णतेची लाट अशा विविध आपत्तींमुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या मृत्यू व नुकसानाची आकडेवारी दिली आहे.

हवामान बदलामुळे होत असलेला परिणामाचा यात उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालानुसार जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी, पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना सर्वाधिक घडल्या. या नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव राज्यात ही दिसून आला. दरम्यान जागतिक पातळीवर अशा आपत्तींमुळे होणाऱ्या जीवितहानीची स्थिती पाहता सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या तीन देशांमध्ये भारताचा ही समावेश आहे.

अहवालातील ठळक बाबी

  • हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले

  • १९०१ ते २०१८ दरम्यान देशाच्या भूपृष्ठावरील तापमानात ०.७ अंश सेल्सिअसने वाढ

  • अलीकडच्या दशकात हिंदी महासागरातील तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ

  • तर २०१२-२०२१ हे देशासाठी उष्ण दशक ठरले

सप्टेंबर महिन्यात आपत्तीची अनुभूती

सप्टेंबर महिन्यात सर्व ३० दिवसांमध्ये प्रतिकूल हवामानाची अनुभूती झाली. देशातील ३१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोणत्या न कोणत्या नैसर्गिक आपत्तीची नोंद या काळात झाली. त्यामध्ये सर्वाधिक जास्त आपत्तींचे दिवस हे उत्तर प्रदेश (२४ दिवस), महाराष्ट्र (१९ दिवस) आणि मध्य प्रदेश (१८ दिवस) या तीन राज्यांमध्ये पाहायला मिळाले.

देशातील स्थिती

  • २४१ आपत्ती उद्‍भवलेले दिवस

  • ६९००७ - प्राण्यांचा मृत्यू

  • २७५५ - मनुष्य जीवितहानी

  • ४१६६६७ - घरांचे नुकसान

  • १.९ द.ल. हेक्टर शेती क्षेत्रावर परिणाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.