ॲमिनीटी स्पेसवर चर्चा करा मग निर्णय घ्या; रिपाइची भूमिका

मुख्य सभेपूर्वी रिपाईच्या शहर पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांकडून भाजपच्या या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला.
Amenity space
Amenity spacesakal
Updated on

पुणे : महापालिकेच्या २७० ॲमिनीटी स्पेस भाड्याने देण्याचा निर्णय भाजपने घेतला असली तरी त्यांचा घटकपक्ष असलेल्या रिपाइने या प्रस्तावावर गडबडीने निर्णय घेऊ नये या जागा भाड्याने गेल्यानंतर गरिबांना मोफत सुविधा मिळणार का? यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. त्यानंतर निर्णय घ्या, अशी भूमिका मांडली आहे.

आज झालेल्या ऑगस्ट महिन्याच्या मुख्यसभेत हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आहे. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सुमारे अडीचशे मिळकती भाडेकराराने देण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीत बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आला. यास सर्व राजकीय पक्षांनी विरोध आहे. आज मुख्यसभेपूर्वी रिपाईच्या शहर पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांकडून भाजपच्या या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला. ॲमिनिटी स्पेस भाड्याने दिल्या तर तेथील सुविधा या सशुल्क असणार आहेत, मग शहरातील गरीब नागरिकांना या सेवा कशा परवडतील ? असा प्रश्‍न यावेळी उपस्थित करण्यात आला. जर शहराच्या हितासाठी निर्णय घ्यायचा असेल तर यावर सखोल चर्चा झाली पाहिजे, नागरिकांना न्याय मिळणार असेल तरच यास पाठिंबा दिला जाईल, असे रिपाईचे नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले

Amenity space
‘तालिबानीस्तान’मुळे ड्राय फ्रूट आयातीला फटका

सभागृहनेते गणेश बीडकर म्हणाले, ‘‘रिपाइने या प्रस्तावास विरोध केला नाही, पण यासंदर्भात माहिती हवी आहे असे त्यांनी सांगितले असून, त्यांना सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच हा विषय शहराच्या हिताचा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भेटून चर्चा करण्याचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.