Pune: आम्ही बी माणसचं, जनावरं नाही....पुण्यातील सफाई कामगारांकडे मनपाचे दुर्लक्ष! मूलभूत सुविधा न पुरवल्यामुळे अनेक रोगांचे शिकार

Latest Pune Municipal Corporation News | प्रशासन मात्र आमच्याकडे लक्ष द्यायला पण तयार नाही. अस गाऱ्हाणं कचरा वेचकानी सकाळ प्रतिनिधिंकडे मांडले.
 पुण्याचा कचरा वेचनाऱ्यांकडेच मनपाचे दुर्लक्ष, मूलभूत सुविधा न पुरवल्यामुळे होत आहेत अनेक रोग अन् आजार
Pune balewadi News sakal
Updated on

Latest Balevadi News: मुंबई बंगळूर महामार्गाजवळच पुणे महापालिके कडून कचरा वर्गीकरण व संकलन केंद्रासाठी पत्र्याचे मोठे शेड उभारले आहे, त्यात 'स्वच्छ 'चे कर्मचारी बसून कचरा वर्गिकरणाचे काम करतात. पण सध्या या शेडमध्ये पावसामुळे पाणी साठून खूप चिखल झाला आहे.

अशा गुडघाभर पाण्यातून, चिखलातून हे कचरा वेचक येजा करतात. शेडमध्ये बसता येईना म्हणून शेड जवळच्या मोकळ्या जागेत भर पावसात बसून हे कचरा वेगळा करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना अनेक त्वचा रोग, ताप, सर्दी, खोकला ,डेंगी सारखे आजार बळावत आहेत.

 पुण्याचा कचरा वेचनाऱ्यांकडेच मनपाचे दुर्लक्ष, मूलभूत सुविधा न पुरवल्यामुळे होत आहेत अनेक रोग अन् आजार
पुणे जिल्ह्यात पावासाचा धुमाकूळ; कुठे, काय परिस्थिती?

महापालिकेने या ठिकाणी चिखल होऊ नये म्हणून कोणतीही उपायोजना केलेली नाही.तसेच वेळेवर कचरा न्यायला गाड्या पाठवल्या जात नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा इथेच पडून सगळया परिसरात दुर्गंधी पसरते. तरी आमच्या आरोग्याकडे पण लक्ष दया , कचरा वेळेत न्या अशी मागणी कचरा वेचक करत आहेत.

गाऱ्हाणं

बालेवाडी येथे मुंबई बंगळूर महामार्गाजवळच महापालिकेने कचरा संकलन व वार्गिकरनासाठी मोठे पत्रा शेड उभारले आहे. याठिकाणी बालेवाडी ,बनस्वच्छ संस्थेचे कर्मचारी दिवसभर बसून कचरा विलगीकरण करतात. इथूनच कचरा भरून पुढे प्रक्रिया करण्यासाठी पाठवला जातो. सद्या या ठिकाणी पावसाचे पाणी साठून खूप चिखल झाला आहे.

हा चिखल तुडवत या कामगारांना येथून ये जा करावी लागते. अनेक वेळा तक्रार करून पण काहीच फायदा झाला नाही. दोन वेळा मुरूम आणून टाकला पण तो ही पसरवला नाही. कचरा न्यायला नियमित गाड्या येत नसल्याने खूप मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होतो. शेड समोर चिखल झाल्याने तिथे जाता येत नाही. म्हणून शेडच्या बाजूच्या मैदानात बसून कचरा वेचक भर पावसात काम करतात. त्यामुळे त्यांना सर्दी, खोकला,ताप, डेंगी,त्वचा रोगा सारख्या रोगांनी ग्रासाले आहे. प्रशासन मात्र आमच्याकडे लक्ष द्यायला पण तयार नाही. अस गाऱ्हाणं कचरा वेचकानी सकाळ प्रतिनिधिंकडे मांडले.

-

 पुण्याचा कचरा वेचनाऱ्यांकडेच मनपाचे दुर्लक्ष, मूलभूत सुविधा न पुरवल्यामुळे होत आहेत अनेक रोग अन् आजार
Pune Houses Sold : पुण्याच्या निवासी क्षेत्रात सात महिन्यांतच एक लाखांहून अधिक घरांची झाली विक्री; नाइट फ्रँक इंडियाचा अहवाल

गेल्या महिनाभर आम्ही भर पावसात काम करतोय. इथ लई चीखल झालाय, बसायची पण सोय नाही. रेनकोट आम्हाला अजून पर्यंत मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेक आजार होत आहेत. कमवतोय तेव्हढे पैसे दवाखान्यात देऊन यावे लागत आहेत.तरी प्रशासनाने आमचा प्रश्न सोडवावा.

रतन जाधव, कचरा वेचक.

चिखलात, पावसात भिजून कपडे ओले होतात. कचऱ्यामुळे अंगाचा वास येतो. दुकानात सामान आणायला गेलो, किंवा बँकेत गेलो तर लांब उभे रहायला सांगतात. आम्ही पण माणस आहोत, जनावर नाही. तुमचाच कचरा आम्ही गोळा करतो.हे कोणाच्या लक्षात येत नाही.

लता आडगळे , कचरा वेचक.

या ठिकाणी रोज जवळपास १२ टन कचरा गोळा करून आणला जातो, महापालिकेकडून रोजच्या रोज कचरा नेला जात नाही. त्यामुळे इथे खूप कचरा जमा होतो. कचरा न्यायला येणारे वाहन चालक आमच्यावरच दम दाटी करतात, शिव्या ही देतात. गाडी वेळेत आली नाही यात आमचा काय दोष आहे. सगळे जण 'स्वच्छ 'च्या नावानेच ओरडतात.

सचिन वाघमारे, कचरा वेचक.

 पुण्याचा कचरा वेचनाऱ्यांकडेच मनपाचे दुर्लक्ष, मूलभूत सुविधा न पुरवल्यामुळे होत आहेत अनेक रोग अन् आजार
Mumbai Pune News: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास अर्ध्या तासानं घटणार

या ठिकाणी नेहमीच कचऱ्याचे ढीग असतात, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियम मध्ये मोठा कार्यक्रम असेल, कोणी मंत्री येणार असतील तरच इथे साफसफाई केली जाते. अन्यथा इथून ये जा करणे मुश्किल होऊन जाते.

संतोष बालवडकर. रहिवासी

कालच बराच कचरा उचलला आहे.पावसाळ्याच्या दिवसात कचरा प्रकल्पावर काही तांत्रिक अडचणी मुळे कचऱ्याच्या गाड्या खाली व्हायला वेळ लागतो, परिणामी गाड्यांची कमतरता भासते. तरी असे असल्यास पर्यायी व्यवस्था करून कचरा उचलला जाईल.

विजय भोईर, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय.

 पुण्याचा कचरा वेचनाऱ्यांकडेच मनपाचे दुर्लक्ष, मूलभूत सुविधा न पुरवल्यामुळे होत आहेत अनेक रोग अन् आजार
Pune Houses Sold : पुण्याच्या निवासी क्षेत्रात सात महिन्यांतच एक लाखांहून अधिक घरांची झाली विक्री; नाइट फ्रँक इंडियाचा अहवाल

या संदर्भात वरिष्ठ आरोग्य निरिक्षकांना सुचना करण्यात येतील, तसेच येथे काल पासूनच मुरूम टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, हे काम त्वरित पुर्ण करून घेतले जाईल.

संदिप कदम, उपायुक्त, घन कचरा व्यवस्थापन

 पुण्याचा कचरा वेचनाऱ्यांकडेच मनपाचे दुर्लक्ष, मूलभूत सुविधा न पुरवल्यामुळे होत आहेत अनेक रोग अन् आजार
Pune News: सिंहगड रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, वाहनचालकांसह नागरिक हैराण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.