पुणे - केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहनचालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारला आहे. संपामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरातील काही पेट्रोल पंप सोमवारी बंद होते. त्यामुळे सुरू असलेल्या पंपावर इंधन भरण्यासाठी गर्दी झाली होती.
सोमवारी रात्री पुरवठा सुरळीत झाल्यानंतर गर्दी कमी झाली होती. दरम्यान वाहनचालकांच्या संपामुळे इंधन मिळणार नाही, या भीतीमुळे आणि इंधनाची दरवाढ होणार आहे, अशी अफवा पसरली होती. त्यामुळे गर्दीत भर पडली आहे. मात्र, आता पुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे सर्व पेट्रोल पंप सुरु राहतील, असे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले.
दरम्यान सोमवारी दिवसभर शहरातील काही पेट्रोल पंपावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. तर, काही पंप बंद दिसून आले. दहा मिनिटांपासून चाळीस मिनिटांपर्यंत थांबल्यानंतर ग्राहकांना पेट्रोल मिळाले. केंद्र शासनाच्यावतीने वाहन कायद्यात काही बदल करण्यात येणार आहे. या बदलांना विरोध करत देशभरातील वाहन चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे.
या संपामध्ये पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे चालक देखील सहभागी असल्याने पुढील दोन ते तीन दिवस पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवेल या भीतीने शहरातील अनेक पेट्रोल पंपावर अचानक वाहनधारकांनी गर्दी झाली होती. अनेक पेट्रोल पंपावरचा डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा संपला होता. तर, काही ठिकाणी शिल्लक असलेल्या पेट्रोल-डिझेल मिळावे, यासाठी वाहनधारकांनी एकच गर्दी केले होती.
इंधनाचा पुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप मंगळवारी (ता. २) खुले राहणार आहेत. संपूर्ण भारतातील वाहतूकदारांच्या संपाचा पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही. जिल्हा प्रशासनाने लोणी डेपो पेट्रोलियम पदार्थांच्या रिफिलिंगसाठी पेट्रोलियम टँकरना पोलिस संरक्षण दिले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत.
- अली दारूवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.