Pune Water Supply : पेठांमधील पाणीपुरवठा विस्कळित; तीन दिवसांत पाण्याचे वेळापत्रक कोलमडले

शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे यासाठी गेल्या सहा वर्षांपासून समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.
Pune Water Supply
Pune Water SupplySakal
Updated on

Pune News : गेल्या आठवडाभरापासून शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कमी वेळ आणि कमी दाबाने पाणी येत असून, महापालिकेकडे तक्रारी करूनदेखील यात सुधारणा झालेली नाही.

शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे यासाठी गेल्या सहा वर्षांपासून समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. शहराच्या सर्वच भागांत नवीन जलवाहिन्या टाकणे, टाक्या बांधणे, नळजोडांना मीटर बसविणे, अशी कामे झाली आहेत. तर काही भागांतील कामे अद्याप शिल्लक आहेत. या योजनेंतर्गत अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. जुन्याच वितरण व्यवस्थेचा वापर केला जात आहे.

मात्र, गुरुवार पेठ, घोरपडे पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठ, नाना पेठ, कसबा पेठ, शुक्रवार पेठ, गंजपेठ, कसबा पेठ, सदाशिव पेठ, नवी पेठ यांसह सर्वच पेठांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यात बुधवार (ता. १२), गुरुवार (ता. १३) आणि शुक्रवार (ता. १४) या तीन दिवसांत पाण्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले आहे.

सकाळी १० वाजता ज्या भागात पाणी सोडले जाते, तेथे पाणी येण्यास दुपारी दोन अडीच वाजले. पाण्याला दाब कमी असल्याने वरच्या मजल्यावर पाणी चढत नव्हते. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

खडकवासला धरणाजवळ विद्युतविषयक कामामुळे वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह इतर ठिकाणी पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळित झाले. पण त्यात आता सुधारणा झाली आहे.

-नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.