काँग्रेस - शिवसेनेच्या मैत्रीमुळे राष्ट्रवादी नाराज

 Dissatisfaction in NCP at Purandar in some places due to lead of Congress and Shiv Sena
Dissatisfaction in NCP at Purandar in some places due to lead of Congress and Shiv Sena
Updated on

माळशिरस : पुरंदर तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये एकमेकांविरोधात लढलेले शिवसेना व काँग्रेस ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काही ग्रामपंचायतीमध्ये एकत्र आघाडी करून राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात निवडणूक लढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्याठिकाणी फटका बसल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये  नाराजीचा सूर जाणवत आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पुरंदर तालुक्यात एकत्र लढल्याने तालुक्यात संजय जगताप यांच्या रुपाने काँग्रेस पक्षाचा आमदार झाले. यामुळे ग्रामपंचायत निवडणुका देखील काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रीत निवडणुकांना शिवसेना विरोधात सर्व ठिकाणी सामोरे जातील अशी प्रत्येक गावात निवडणूक होत असलेल्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची धारणा होती.

तालुक्यात बऱ्याच ठिकाणी असे समीकरण पाहावयास देखील मिळाले मात्र पिसर्वे, गुरोळी, दिवे निरा यांसारख्या काही ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकाच्या थेट विरोधात लढले. यामध्ये दिव्यासारखा गावात तर काँग्रेसने भाजप नेत्यांबरोबर हातमिळवणी करत राष्ट्रवादीचे पानिपत केले. तर पिसर्वे  सारखे गावात काँग्रेसच्या ताकतीचा वापर करत शिवसेनेने राष्ट्रवादीला सत्ते पासून रोखू शकले. नीरा सारखी मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या गावामध्ये काँग्रेसने इतर सर्व समविचारी गटा बरोबरच राष्ट्रवादीचे देखील काही अंतस्थ बरोबर घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम खात्याचे सभापती पद भूषवलेले दत्ता चव्हाण यांना पराभूत करण्याबरोबरच त्यांच्या पॅनेलचा देखील दारुण पराभव केला. काँग्रेसने अशा काही ठिकाणी राष्ट्रवादीला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षातील स्थानिक गावपातळीवरील कार्यकर्त्यांबरोबर केलेल्या जुळवाजुळवीमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काहीशे नाराज दिसत आहे. यामुळेच खासदार सुप्रिया सुळे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार प्रसंगी सासवड येथील कार्यक्रमाला आले असता राष्ट्रवादीतील अनेक नेतेमंडळींनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर आपला नाराजीचा सूर व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत  कॉंग्रेस पक्षाला मतदान केल्याचे हेच आम्हाला फळ काय असा सूर देखील काही कार्यकत्यांच्यात ऐकावयास मिळाला.

पुण्याचे दोन नेते महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी 

अशा आघाडीचा काँग्रेसला प्रत्यक्षात फायदा किती-राष्ट्रवादी सोडून काही ठिकाणी इतरांशी केलेल्या आघाडीबाबत पिसर्वे, दिवे ,गुरोळी या ठिकाणचे चित्र पाहता प्रत्यक्षात काँग्रेसपेक्षा इतरांनाच या आघाडीचा फायदा झाल्याने अशी आघाडी करून काँग्रेसने मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला तालुक्यात नाराज करायला नको होते असे खाजगीत काँग्रेस पक्षातील देखील एका जाणकार नेत्याने मत व्यक्त केले.


गाव पातळीवरील निवडणुकात वरिष्ठांनी लांब राहणे गरजेचे- राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील- ग्रामपंचायत निवडणूकातील या घडामोडींविषयी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांच्याशी संपर्क साधता, ग्रामपंचायती या स्थानिक समिकरणा नुसार होत असतात . स्थानिक हेवेदावे व हितसंबंध यामध्ये पाहिले जात असल्याने वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळींनी या निवडणुकात लांब राहणेच योग्य असे मत त्यांनी व्यक्त केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.