पुरंदरमध्ये जिल्हा बँकेच्या खरीप हंगामाचे ११३ कोटींचे पीक कर्ज वाटप : आमदार जगताप

पुरंदरमध्ये जिल्हा बँकेच्या खरीप हंगामाचे ११३ कोटींचे पीक कर्ज वाटप : आमदार जगताप
Updated on

गराडे ः तालुक्यातील बँकेच्या १३ शाखा व ९५ विकास संस्थांमधून १७ हजार १५९ शेतकरी सभासदांना १९५०९.२१ हेक्टर क्षेत्रावर ११३ कोटी ३ लक्ष ६६ हजाराची पीक कर्ज वाटप केल्याची माहिती पुणे जिल्हा बँकेचे बँक संचालक व आमदार संजय जगताप  यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या वतीने दरवर्षी खरीप हंगाम पीक कर्ज वाटप १ एप्रिल पासून सुरु होते. परंतु २३ मार्च २०२० पासून कोरोना महामारित लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे चालू खरीप हंगामात पीक कर्ज वाटप करण्याची प्रमुख समस्या जिल्हा बँकेवर होती.

यात मार्ग काढण्यासाठी बॅंकेच्या संचालक मंडळात ठराव घेण्यात आला, की ज्या शेतकरी सभासदांनी ३१ मार्चपूर्वी त्यांच्याकडे असणाऱ्या पीक कर्जाची संपूर्ण बाकी भरतील अशा सर्व पात्र शेतकरी सभासदांना त्यांनी केलेल्या उचल रक्कम इतकी रक्कम चालू खरीप हंगामात देण्यात यावी. जर अशा शेतकरी सभासदांना सातबारा उपलब्ध करणे शक्य नसेल अश्या सभासदांना मागील वर्षीच्या वाटपातील पिक सातबारा गृहीत धरावा.

पुरंदर तालुक्यातील ९५ विविध कार्यकारी संस्थेचे माध्यमातून होणारे पीक कर्ज वाटप सुरळीत व्हावे यासाठी अ वर्गातील संचालक व विद्यमान आमदार संजय चंदूकाका जगताप यांनी पिडीसीसी बँकेच्या तालुक्यातील अधिकाऱ्यांची व सचिवांची ऑनलाइन मीटिंग घेऊन त्यांना वाटप करण्या संदर्भात योग्य त्या सूचना दिल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानुसार जे शेतकरी गेली ४ वर्षापासून संस्थेच्या कर्जाच्या थकबाकीत होते. त्यांना एक दिलासा म्हणून आघाडी सरकारने केलेली पीक कर्ज माफी होय. वंचित शेतकऱ्यांना या कर्जाचा लाभ घेता आला. शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी न करता सभासदांच्या कर्ज खात्यात त्याचे असणारी पीक कर्जाची रक्कम जमा केली अशी माहिती तालुक्याची सहायक निबंधक मनोजकुमार गायकवाड, बॅंकेचे विभागीय अधिकारी सुरेश चव्हाण यांनी दिली.

यावेळी वसुली अधिकारी उत्तम शिंदे, पुरंदर नगरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, बँक अधिकारी जयेश गद्रे, राजन जगताप, महेश खैरे, किरण जाधव,  हरीश जगताप, मयुर भुजबळ, पवन दुर्गाडे व सचिव तुकाराम गायकवाड, रफिक शेख, मुकुंद जगताप, नामदेव शेवते, हनीफ सय्यद, बंडू ताकवले, दीपक जगताप, अमोल यादव, अमोल फडतरे, वैभव काकडे, सुहास जगताप, रसूल शेख, संतोष गुरव, राहुल घारे, जालिंदर बाठे यांनी काम पाहिले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.