पालखी सोहळ्याबाबत विभागीय आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी झाली.
पुणे : आषाढी वारी पालखी सोहळ्यात पायी जाण्याची मागणी वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली. तर, वारीत इतर भाविकांनी दर्शनासाठी सहभागी होण्याचा प्रयत्न केल्यास गर्दी होइल, त्यामुळे वारकरी संप्रदायाने फेरविचार करावा, असे आवाहन प्रशासनाने केले. दरम्यान, समितीकडून या चर्चेचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. (Divisional Commissioner Saurabh Rao informed that report regarding Aashadhi Wari palakhi sohala will be sent to State govt)
पालखी सोहळ्याबाबत विभागीय आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी (ता.७) झाली. या वेळी वारकरी संप्रदायातील प्रतिनिधींसमवेत पालखी सोहळ्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच तीनही जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक उपस्थित होते. या बैठकीला विविध दिंडी प्रमुख यांनी त्यांचे म्हणणे मांडले. त्या सर्वांचे म्हणणे या समितीने ऐकून घेतले.
आषाढी वारीमध्ये पायी चालण्याची परवानगी द्यावी, असा आग्रह आळंदी, देहू, पैठण आणि इतर संस्थांनासह वारकरी प्रतिनिधींनी बैठकीत धरला. प्रशासनाने वारकऱ्यांचा भावनांचा विचार करून सरकारला सकारात्मक अहवाल पाठवावा.
- राजाभाऊ चोपदार, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मानकरी
वारकरी संप्रदायाकडून पायी वारीची मागणी करण्यात आली. प्रशासनाने वारीतील संख्येची मर्यादा द्यावी, निर्बंधही असावेत. परंतु मोजक्या वारकऱ्यांमध्ये पादुका घेउन पायी वारीची परवानगी द्यावी.
- संजय मोरे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख
सरकारने प्रतिकात्मक का होईना पायी वारीची परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली. वारीत संख्या किती असावी, याबाबत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येईल. यंदाच्या वारीवर निर्बंध चालतील, परंतु पादुकांसह पायी वारीची परवानगी द्यावी.
- अभय टिळक, प्रमुख विश्वस्त, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान
पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.