पुणे: लग्नानंतर शरीरसंबंध न ठेवणे एक प्रकारची क्रूरता असल्याचा निष्कर्ष काढत एका प्रकरणात न्यायालयाने पत्नीला घटस्फोट मंजूर केला आहे. दोष असल्याने पती शरीरसंबंध ठेवू शकत नसल्याचे वैद्यकीय तपासणीनंतर सिद्ध झाल्याने पत्नीने दावा दाखल केला होता. त्याआधारे हा निकाल देण्यात आला. पतीने लग्नानंतर तब्बल सात वर्षे शरीरसंबंध ठेवले नव्हते.
रमेश (वय ३७) आणि रेश्मा (वय २७, दोघांची नावे बदललेली) हे या प्रकरणातील जोडपे आहे. रमेश शिक्षक, तर रेश्मा गृहिणी आहेत. त्यांचे मे २०१४ मध्ये ठरवून लग्न झाले होते.