पुणे - गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात कपात करण्यास राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) त्यापुढे एक पाऊल टाकले आहे. अशी घरे नियमित करण्यासाठी अमेनिस्टी स्कीम (सवलत योजना) लागू केली असून, ३१ मे २०२५ पर्यंत प्रस्ताव दाखल केल्यास नियमितीकरण शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे २३ गावांसह प्राधिकरणाच्या हद्दीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.