स्व-रुपवर्धिनीचे 'ज्ञापुं' काळाच्या पडद्याआड; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी

Dnyanesh_Purandare
Dnyanesh_Purandare
Updated on

पुणे : स्व-रुपवर्धिनीचे पूर्णवेळ कार्यकर्ते ज्ञानेश पुरंदरे (वय ४९) अर्थात 'ज्ञापु' यांचे बुधवारी (ता.२२) दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, वहिनी, दोन पुतण्या असा परिवार आहे. गेले दोन आठवडे ते कोरोना संसर्गाने आजारी होते. आजाराची गुंतागुंत वाढल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात गेल्या आठवडाभरापासून उपचार सुरू होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. 

अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी काही काळ बजाज ऑटोमध्ये नोकरी केली होती. स्व-रूपवर्धिनीचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी त्यांनी 1996 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते स्व-रूपवर्धिनीच्या विविध जबाबदाऱ्या निभावत होते. अलीकडे काही वर्षांपासून त्यांच्याकडे कार्यवाहपदाची जबाबदारी होती. शिवचरित्राचे फर्डे व्याख्याते म्हणूनही ते महाराष्ट्रभर परिचित होते. पुण्यातील गुजरवाडी येथील ओंकार न्यासचेही ते विश्वस्त होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक होते.

पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी (ता. २ ऑगस्ट) श्रद्धांजली सभा घेण्यात येणार असल्याची माहिती स्व-रूपवर्धिनीचे सहकार्याध्यक्ष संजय तांबट यांनी दिली आहे. संस्थेचे कार्यवाह म्हणून समाजातील दुर्लक्षित घटकांना शिक्षण आणि कौशल्य विकासातून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पुरंदरे त्यांनी केले. 'विकसित व्हावे, अर्पित होऊनि जावे' हे स्व-रुपवर्धिनीचे ब्रीदवाक्‍य त्यांनी सार्थ केल्याची कृतज्ञ भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.