Otur News : ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील तो डॉक्टर अखेर सेवेतून बडतर्फ

प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरला सर्पदंश झालेल्या चार वर्षाच्या मुलीवर उपचारात हलगर्जीपणा व टाळाटाळ केली म्हणून अखेर सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
Doctor
Doctorsakal
Updated on

ओतूर - ओतूर, ता. जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरला सर्पदंश झालेल्या चार वर्षाच्या मुलीवर उपचारात हलगर्जीपणा व टाळाटाळ केली म्हणून अखेर सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल डुंबरे यांनी नियुक्तीच्या अटी, शर्ती व नियम भंग केल्यामुळे त्यांची सेवा ३१ जुलै २०२४ पासून संपुष्टात आणत असल्याचा आदेश पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी दिले आहे.

Doctor
Snake Bite : चार वर्षाच्या चिमुरडीचा सर्पदंशामुळे मृत्यू, डॉक्टरांनी हलगर्जी केल्याचा नातेवाईकांचा आरोप

याबाबत अधिक माहिती अशी की, आफ्रोज शेख ही चिमुरडी सोमवारी ता. २९ रोजी भोईरवाडी येथे आजोबांच्या घरात आई सोबत झोपली होती, रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झोपेत असताना तिला विषारी सर्प चावला. सर्पदंश झाल्यामुळे तिच्या कुटुंबातल्या सदस्यांनी तिला उपचारासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.

येथील कर्मचाऱ्यांना मुलीला सर्पदंश (नाग) झाला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली, रूग्णालयातील परिचारिकेने रूग्णालयातून डॉ. विशाल डुंबरे यांना फोन करून याबाबत माहिती दिली. डुंबरे यांनी सदर मुलीला नागाचा दंश असल्याने तिला उपचारासाठी पुढे नारायणगाव येथे घेऊन जाण्यास फोनवरच सांगितले.

त्यानंतर सदर चिमुरडीला नारायणगाव येथे डॉक्टरनी मृत घोषित केले.याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी ओतूर येथे डॉक्टरांनी उपचार केले असते तर आमची मुलगी वाचली असती, उपचारास टाळाटाळ करणार्‍या डॉक्टर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली. तसेच या घटनेची दखल घेऊन आदिवासी नेते देवराम लांडे यांनी सदर डॉक्टरवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलनाचा इशारा दऊन, कारवाई साठी पाठपुरावा केला.

तर मनसे तालुकाध्यक्ष तानाजी तांबे यांनी ही या प्रकरणी चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दोषींवर कडक कारवाई ची मागणी केली होती. याबाबतचे सविस्तर वृत्त दै. सकाळ मध्ये ही प्रसिध्द झाले होते. त्यामुळे या प्रकरणाची पुणे जिल्हा आरोग्य विभागाने गंभीर दखल घेऊन चौकशी करून सदर डॉक्टरची सेवा संपुष्टात आणली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.