'कोरेगाव पार्क'चे नाव राहणार कायम; 'हे' नाव करण्याचा होता प्रस्ताव

does not renamed Koregaon Park areas by PMC
does not renamed Koregaon Park areas by PMC
Updated on

पुणे : कोरेगाव पार्कचे नामांतर करून पिंगळेनगर करण्याच्या ठरावाचा फेरविचार करण्यासाठी स्थानिक नगरसेवकाने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पत्र सादर केला आहे. त्यामुळे कोरेगाव पार्क हे नाव कायम रहावे, यासाठी आंदोलन करणाऱ्या रहिवाशांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या बाबतचा औपचारिक निर्णय 3 फेब्रुवारी रोजी जाहीर होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरेगाव पार्कमधील गल्ली क्रमांक 5 ते 9 दरम्यानच्या भागाचे नामकरण पिंगळेनगर करावे, असा प्रस्ताव महापालिकेच्या नाव समितीने नुकताच मंजूर केला होता. नगरसेविका लता धायरकर, हिमानी कांबळे आणि नगरसेवक उमेश गायकवाड यांनी तो सादर केला होता. परंतु, स्थानिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांच्यासह परिसरातील रहिवासी (निवृत्त) मेजर जनरल एस. एल. वीज, डॅनी लोबो, नीनी नरसिंघन, जगदिश गुप्ता, माधवी कुट्टी, योगेश ठक्कर, संजय पाटील, नाना फटाडो, नीलम पाटील, दिलनवाज दमानिया, रीती मल्होत्रा, स्वामी भूपेश, अभिजीत वाघचौरे, विजय जगताप, शुभांगी वखारे आदींनी गेले आठ दिवस आंदोलन केले. कोरेगाव पार्कचे नाव कायम रहावे, यासाठी त्यांनी महापौर, आयुक्त आदींच्या भेटीगाठी घेतल्या.

भारतात कोरोना विषाणूचा पहिला बळी; केरळमध्ये आढळला रुग्ण

नाव समितीचे अध्यक्ष राजेश येनपुरे यांनाही नागरिकांच्या समितीने निवेदन दिले होते. या पार्श्‍वभूमीवर नगरसेवक उमेश गायकवाड कोरेगाव पार्क नाव कायम ठेवावे, असे पत्र महापौरांना दिले आहे. तीन फेब्रुवारी रोजी नाव समितीच्या बैठकीत नावातील बदलाचा पूर्वी मंजूर झालेला ठराव रद्द होईल, असे अपेक्षित आहे. या बाबत तिवारी म्हणाल्या, "कोरेगाव पार्क हे नाव पूर्वीपासून आहे. एखाद्या कुटुंबाचे नाव या भागाला देण्याचे काही कारण नाही. आमचा विरोध त्यांना नाही. परंतु, कोरेगाव पार्क हे नाव कायम राहिले पाहिजे, अशी आम्ही रहिवाशांची इच्छा आहे.

म्हणून हवे होते पिंगळेनगर...
कोरेगाव पार्क वसविण्यापूर्वी तेथे पिंगळे कुटुंबियांच्या मालकिच्या जमिनी मोठ्या प्रमाणात होत्या. तसेच पूर्वी या भागात पिंगळे मळाही होता. परंतु, शहराचा विस्तार होत असल्यामुळे मोबादला देऊन महापालिकेने त्या जमिनी संपादीत केल्या होत्या. त्याची आठवण म्हणून पाच गल्ल्यांना पिंगळेनगर असे नाव द्यावे, अशी पिंगळे कुटुंबियांची इच्छा होती. परंतु, कोरेगाव पार्कमधील "कॉस्मोपॉलिटन' नागरिकांनी कोरेगाव पार्क हे नाव कायम ठेवावे, असा आग्रह सध्या धरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.