Pune News : नखे कापण्यासाठी पेट क्लिनिकमध्ये आणलेल्या श्वानाचा गळफास लागून मृत्यू

नखे कापण्यासाठी पेट क्लिनिकमध्ये आणलेल्या लॅब्रोडर श्वानाचा गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना पाषाण परिसरात घडली.
Dog Death
Dog Deathsakal
Updated on

पुणे - नखे कापण्यासाठी पेट क्लिनिकमध्ये आणलेल्या लॅब्रोडर श्वानाचा गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना पाषाण परिसरात घडली. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी पशुवैद्यकीय तज्ज्ञासह चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला लॅब्रोडर श्वानाला घेऊन त्याचे लसीकरण आणि नखे कापण्यासाठी पेट क्लिनिकमध्ये आली होती. तिने श्वानाला डॉक्टरांकडे सोपवले.

डॉक्टर आणि त्यांचे मदतनीस श्वानाची नखे कापण्यासाठी त्याला पट्ट्याने झाडाला बांधत होते. परंतु श्वानाला पट्ट्याचा गळफास बसल्याने श्वान खाली कोसळले. त्यानंतर डॉक्टरांनी श्वानाला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु श्वानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे श्वानाचा मृत्यू झाल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास चतु:शृंगी पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.