Gas Explosion : मोहितेवाडीत घरगुती वापराच्या गॅसच्या टँकरचा स्फोट;गॅस टँकर पूर्ण जळून खाक, दोन कंटेनर जळाले

चाकण -शिक्रापूर मार्गांवर शेलपिंपळगाव मोहितेवाडी ता. खेड गावच्या हद्दीत मोहिते वाडी फाट्याजवळ एका ढाब्याजवळ उभ्या असलेल्या गॅस टँकरचा पहाटे सव्वा चार च्या सुमारास गॅस बाहेर आल्यानंतर मोठा स्फोट झाला.
Gas Explosion
Gas Explosionsakal
Updated on

चाकण : चाकण -शिक्रापूर मार्गांवर शेलपिंपळगाव मोहितेवाडी ता. खेड गावच्या हद्दीत मोहिते वाडी फाट्याजवळ एका ढाब्याजवळ उभ्या असलेल्या गॅस टँकरचा पहाटे सव्वा चार च्या सुमारास गॅस बाहेर आल्यानंतर मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरात अगदी पाच-दहा किलोमीटरवर येत होते.

गॅसचा स्फोट झाल्यानंतर मोठी आग लागली. आगीच्या भक्षस्थानी शेजारी उभे असलेले दोन कंटेनर जळाले. या आगीत गॅसचा टँकर पूर्णपणे जळून खाक झाला.गॅस टँकरचे पत्र्याचे अवशेष व कंटेनरचे इतर अवशेष अगदी पाचशे फुटावर पडले गेले. शेजारील घरावर वाहनांचे अवशेष पडले गेले. या स्फोटामुळे शेजारील घरांच्या खिडक्यांच्या काचा तसेच पत्रे उडाले घरातील फर्निचर चे मोठे नुकसान झाले. स्फोट भयानक होता. कंटेनर मधील काही कंपन्यांचा माल ही जळून गेला. त्यामुळे अंदाजे सुमारे 60 ते 70 लाखावर मालमत्तेचे नुकसान झाले. असा प्राथमिक अंदाज आहे. अशी माहिती पिंपरी -चिंचवड चे पोलीस उपायुक्त डॉ.शिवाजी पवार यांनी दिली.

चाकण -शिक्रापूर मार्गावर आज पहाटे साडेचार च्या सुमारास मोहितेवाडी फाट्याजवळ असलेल्या एका ढाब्यावर गॅस टँकर तसेच कंटेनर उभे होते . सव्वा चारच्या समोरास गॅस टँकर मधील गॅस बाहेर आला त्यानंतर आग लागली गेली व त्यानंतर मोठे स्फोट झाले. त्या स्फोटामुळे आग लागली.ढाब्याची इमारत पत्राची कोसळली गेली. शेजारील चार घरांचे नुकसान झाले. माणसे ऐनवेळी बाहेर काढल्याने जीवितहानी टळली.

आग इतकी भयानक होती की आगीचे लोट उंच आकाशात होते.आगीने मोठे रौद्र रूप धारण केले होते.ज्या गॅस टँकरचा स्फोट झाला त्या गॅस टँकरचे साहित्य परिसरातील शेतात कोसळले गेले. शेजारील आंब्याच्या बागातील आंबे जमिनीवर पडले. तसेच पिकांनाही, झाडांनाही आगीचा मोठाचटका बसला.मोठया आगीमुळे तसेच स्फोटामुळे मोहितेवाडीतील शेजारी घरातील नागरिक भयभीत झाले होते. स्फोट झाला त्या परिसरातील घरामध्ये शंभर ते सव्वाशे लोक राहतात ते लोक तत्काळ बाहेर गेल्यामुळे जीवित हानी टळली.

त्यानंतर चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ तसेच इतर पोलीस अधिकारी, पिंपरी चिंचवड चे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. शेलपिंपळगावचे मंडलअधिकारी माणिक गायकवाड यांनी तसेच तलाठ्यांनी घटनास्थळी भेट दिली. शेलपिंपळगाव ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी उत्तम कांबळे, सरपंच शरद मोहिते यांनी ही भेट दिली.

या ठिकाणी झालेले स्फोट त्यामुळे झालेले नुकसान पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्फोट ज्यावेळेस चालू होते तसेच आग लागली होती त्यावेळेस चाकण -शिक्रापूर मार्ग जवळच असल्याने मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. आग दोन तासात दोन अग्नीशमन बंबाच्या सहाय्याने विझवण्यात आली. आग लागल्यानंतर दोन कंटेनर चे चालक त्याच परिसरात होते तसेच टँकरचा चालक व ढाब्यावरील एकजण फरार झालेला आहे. पोलिसांच्या वतीने घटनेचा पंचनामा सुरू होता.

स्फोटाबाबत तसेच आगीबाबत शेजारील राहणारे शरद मोहिते,अविनाश मोहिते, अमित मोहिते यांनी सांगितले की, " ही दुर्घटना मोठी होती,आग मोठी होती तसेच स्फोट मोठे होते. आमच्या घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या. पत्रे उडून गेले तसेच फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.घराच्या भिंतीना तडे गेले.स्फोट झाल्या नंतर तसेच आग लागल्यानंतर घरातील लोक तसेच शेजारील दुसऱ्या ढाब्यातील लोकं इतरत्र हलवल्यामुळे जीवित हानी झाली नाही.

ढाब्यासमोर गॅस टँकर व कंटेनर उभे होते हा ढाबा ओंकार ढाबा नावाने ओळखला जात होता.हा ढाबा एका राजस्थानी व्यक्तीला चालविण्यास दिलेला होता.त्यामुळे तो काय प्रकार तिथे करत होता हे माहिती नाही. तिथे घरगुती वापराच्या गॅस टँकर मधून गॅस काढून छोटया गॅस टाक्यांमध्ये गॅस भरत होते अशी चर्चा आहे. शेलपिंपळगाव चे सरपंच शरद मोहिते यांनी सांगितले की, "हा प्रकार मोठा व भयानक झालेला आहे. गॅस टँकर मधून गॅसची चोरी करत असताना हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. जीवित हानी टळली."

खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले की, "गॅस च्या टँकरचा स्फोट झाला तसेच दोन कंटेनरला आग लागली. परिसरातील घरानाही त्याची झळ पोचली गेली घरांचे नुकसान झाले. घटना दुर्दैवी आहे. टँकर तसेच कंटेनर येथे लावले जातात. गॅस टँकर मधून गॅसची चोरी होते याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे ही मोठी घटना आहे याचा बोध पोलिसांनी तसेच इतरांनी घेणे गरजेचे आहे."

शेलपिंपळगावची मोहितेवाडी, ता. खेड : चाकण -शिक्रापूर मार्गावर एका ढाब्यावर उभे असलेल्या टँकरचा स्फोट झाला तसेच दोन कंटेनरला आग लागली. उंच आकाशात उठलेले आगीचे लोट.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.