Road Boundary Dispute : रस्त्याच्या हद्दीचा वाद नको, नागरिकांना मदत करा! वेळ मारून नेणारे अधिकारी लक्ष्य

हा रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या ताब्यात आहे, तो मुख्य खात्याचा रस्ता आहे, असे हद्दीचे वाद न घालता नागरिकांना त्वरित मदत करा. त्यात वेळ घालवू नका.
pune municipal commissioner rajendra bhosale
pune municipal commissioner rajendra bhosalesakal
Updated on

पुणे - हा रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या ताब्यात आहे, तो मुख्य खात्याचा रस्ता आहे, असे हद्दीचे वाद न घालता नागरिकांना त्वरित मदत करा. त्यात वेळ घालवू नका. शहरात पाणी तुंबल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांनी कोणाच्या निरोपाची वाट न बघता कामाला सुरुवात करावी. मनुष्यबळ, यंत्रसामग्रीची कमतरता भासल्यास मुख्य खात्याकडून मागवून घ्या.

सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असा आदेश देत महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. या बैठकीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी चांगलेच फैलावर घेतले.

शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. महापालिकेकडून नालेसफाई व्यवस्थित केली नसल्याने त्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. या शिष्टमंडळाच्या मागण्यांमध्ये काही गंभीर मुद्दे उपस्थित झाल्याने त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त भोसले यांनी आज (ता. १२) सर्व विभागप्रमुख, उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती आयुक्तांनी दिली.

आयुक्त भोसले म्हणाले, ‘मुसळधार पावसामुळे शहराच्या सर्वच भागांत फटका बसला होता. त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी सांगितले आहे. या उपाययोजना केवळ दोन-चार दिवसांसाठी नाहीत, तर संपूर्ण पावसाळ्यासाठी आहेत.

यंत्रणा तयार ठेवून नागरिकांना त्वरित मदत देण्यास सांगितले आहे. महापालिकेकडे असणारे जेसीबी, गॅसकटर यासह अन्य मशिन उपलब्ध करून ठेवा. महापालिकेकडे जी यंत्रणा उपलब्ध नाही, ती तात्पुरते भाड्याने घ्यावी, निविदा काढण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे क्षेत्रीय कार्यालयांकडे मनुष्यबळ नसेल तर मुख्य खात्याने त्यांना मनुष्यबळ पुरवावे.’

सहाय्यक आयुक्तांवरच जबाबदारी

महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांचे क्षेत्रीय अधिकारीच पावसाळ्याच्या कालावधीत नोडल ऑफिसर म्हणून काम पाहतील. त्यांनी सहाय्यक आयुक्तांच्या संपर्कात राहावे, क्षेत्रीय कार्यालयास हवी ती साधनसामग्री, तांत्रिक सहकार्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्या भागातील नालेसफाईचा आढावा घेण्यास सांगितले आहे.

आयुक्तांच्या बैठकीतील प्रमुख मुद्दे

  • पावसाळा संपेपर्यंत नालेसफाई व पावसाळी गटारांची स्वच्छता करून घ्या

  • झाडे पडण्याच्या घटना कमी करण्यासाठी फांद्यांची छाटणी करा

  • संपूर्ण पावसाळा क्षेत्रीय कार्यालय आणि मुख्य खात्यांमधील समन्वय वाढवा

  • मदतीसाठी व उपाययोजना करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवकांशी संपर्कात राहा, चर्चा करा

  • नेहमीच पाणी साठणारा भाग, नागरी वस्तीत पाणी शिरण्याच्या ठिकाणांविषयी विशेष काळजी घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.