डोर्लेवाडी - काही माणसं प्रचंड ध्येयवेडी असतात. आपल्या इच्छा, आकांक्षा, छंद पूर्ण करण्यासाठी वयाचा, वेळेचा विचार न करता वाटेल ते कष्ट करतात आणि यशस्वीही होतात. डोर्लेवाडीचे (ता. बारामती) सुपुत्र व उद्योजक दशरथ दिनकर जाधव यांनी वयाच्या साठीनंतर सुरुवात करून मागील सात वर्षांत सलग १७ वेळा ‘आयर्नमॅन’ व वयाच्या ६६ व्या वर्षी ‘अल्ट्रामॅन’ ही अत्यंत खडतर स्पर्धा जिंकून स्वतःला सिद्ध केले आहे. शिवाय भारतातील या वयातील पहिली व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे.