पुणे ः कल्याणीनगरमध्ये अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा रक्ताचा अहवाल बदलल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या डॉ. अजय तावरे, डॉ.श्रीहरी हाळनोर, अतुल घटकांबळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्याचे कलम वाढविण्यात आले आहे. संबंधित आरोपींसह पैसे आणून देणारा राहूल गायकवाड अशा चौघांनाही न्यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी मंजुर केली आहे.
अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ.अजय तावरे, डॉ श्रीहरी हाळनोर , शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा७ आणि १३नुसार गुन्हा वाढविण्यात आला आहे. डॉ.तावरे,डॉ.हाळनोर, घटकांबळे यांच्यासह डॉक्टरांना रुग्णालयात पैसे आणून देणारा आरोपी राहुल गायकवाड यास देखील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची पोलीस कोठडी दहा जून रोजी संपुष्टात येत होती. त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीची मुदत अबाधित ठेऊन त्यास न्यायालयीन कोठडी द्यावी.
पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत असून त्यात काही महत्वपूर्ण गोष्टी उलगडा होण्याची शक्यता आहे. आरोपीच्या मोबाईल डाटाचे विश्लेषण करणे आहे, सीसीटिव्ही फुटेज पाहणी करणे आहे तसेच फॉरेन्सिक अहवाल येणे बाकी असल्याने त्यानंतर पुन्हा त्याची कोठडी घेण्यात येईल, असे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी सांगितले. आरोपी राहुल गायकवाड याचे वजन जास्त असून त्यास ब्लड प्रेशर त्रास आहे. त्याचप्रमाणे पोलिस कोठडीत श्वसनाचा त्रास देखील होत आहे. त्याला वैदकिय मदत मिळावी, असे बचाव पक्षाच्या वकीलांनी आपले म्हणणे मांडले. त्यानुसार, न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी मंजूर केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.