पुणे - गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉ. अजित रानडे यांना निलंबित केल्याची माहिती संस्थेचे कुलपती डॉ. बिबेक देबरॉय यांनी पत्रकाद्वारे शनिवारी दिली. डॉ. रानडे यांनी जानेवारी २०२२ मध्ये कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला होता.