वाघोली (पुणे) : "कोरोना ही लढाई प्रत्येकाची आहे. आरोग्य खाते, प्रशासन यांना सहकार्य करूनही लढाई आपण जिंकू. कोरोना काही काळ आपल्या सोबत राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी बाळगावी. दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.'
डॉ. कोल्हे यांनी वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन सर्व आढावा घेतला. तसेच नियोजित क्वारंटाईन सेंटर व कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी बी. जे. एस. कॉलेज व आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले, ग्रामीण भागात बाधितांची संख्या कमी असून सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. ग्रामीण भागातील संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी शहरात जाऊ लागू नये तसेच लक्षणे नसणाऱ्या बाधित रुग्णांना येथेच ठेवता येईल यासाठी वाघोलीत कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे.
यामुळे शहरातील ताण कमी होईल.'
पुणे शहरालगत असूनही वाघोलीत रुग्णांची संख्या पूर्णपणे नियंत्रणात आहे. आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, महसूल विभाग, लोकप्रतिनिधी यांचे हे यश असून आमदार अशोक पवार हे ही विशेषतः वाघोली व तालुक्यात बारीक लक्ष ठेवून आहेत. आपल्या राज्यात परतण्यासाठी परप्रांतीयांचा लोंढा सुरू आहे. त्यांना बॉर्डर पर्यंत नेण्यासाठी लाल परी काम करीत आहे. मात्र, बसला जाऊन येण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागत असल्याने लाल परी मिळण्यास अडचण येत आहे. पोलिस, महसूल विभाग व लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. जिल्हा अंर्तगत नागरिकांना जाण्यासाठी थोड्या मर्यादा आहेत. ज्या जिल्ह्यात जायचे आहे तेथील क्वारंटाईनची क्षमता लक्षात घेऊन पाठवले जात आहे. ही वेळ राजकारण करण्याची नसून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी सातत्याने अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या संपर्कात असल्याचेही डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
यावेळी त्यांनी विविध ठिकाणी पाहणी केली. या प्रसंगी सरपंच वसुंधरा उबाळे, शिवदास उबाळे, राजेंद्र सातव, शांताराम कटके, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, डॉ. सचिन खरात, डॉ. वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.