Amol Kolhe : शिरूरमधून कोल्हेंना ग्रीन सिग्नल! जालना, भिवंडीसाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू

शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत पक्षांतर्गत कुरबुरींवर पदाधिकाऱ्यांना, आमदारांनी थेट तक्रारी करत, बूथ स्तरावर कोणी काम करत नाही अशी तक्रार केली.
Amol Kolhe
Amol KolheEsakal
Updated on

Amol Kolhe - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या हक्काच्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरवात केली असून, आज पुण्यात शिरूर, जालना आणि भिवंडी या तीन मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.

यामध्ये शिरूरचे विद्यमान खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना पक्षाने उमेदवारी निश्‍चीत करून कामाला लागा असे आदेश दिले आहेत. तर जालना व शिरुरसाठी संभाव्या इच्छुकांच्या केवळ नावाची चर्चा झाली, अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

Amol Kolhe
Mumbai news : एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड! पश्चिम रेल्वेवर एसी लोकल रद्द करण्याची नामुष्की

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यात या तीन मतदारसंघांची आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड आदी या बैठकीला उपस्थित होते.

शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत पक्षांतर्गत कुरबुरींवर पदाधिकाऱ्यांना, आमदारांनी थेट तक्रारी करत, बूथ स्तरावर कोणी काम करत नाही अशी तक्रार केली. काही पदाधिकाऱ्यांनी खासदार अमोल कोल्हे यांचा जनसंपर्क कमी पडत असल्याचे मांडले. तर काही पदाधिकाऱ्यांनी शिरूरमधून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी द्यावी अशी भूमिका घेतली. माजी आमदार विलास लांडे यांनी लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक सांगितले.

Amol Kolhe
Mumbai : मुंबईकरांना राखीव साठ्यातील दीड दशलक्ष लिटर पाणी जुलैअखेर पुरविणार; सरकारचा निर्णय

सर्वांशी मते ऐकून घेतल्यानंतर अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना ‘‘आपण निवडणूक लढण्यास तयार आहात का असे शेवटचे विचारत आहे ?’’ असा प्रश्न केला. त्यावर अमोल कोल्हे यांनी ‘‘पक्ष सांगेल ती माझी भूमिका मान्य असेल’’, असे उत्तर दिले. त्यावर पवार यांनी ‘‘तुमचं मत काय आहे हे?’’ असे स्पष्टपणे विचारले.

Amol Kolhe
Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची क्रमवारी घसरली

त्यावर अमोल कोल्हे यांनी ‘‘मी निवडणूक लढविण्यास तयार आहे.’’ असे सांगितले. त्यास शरद पवार यांनी देखील होकार दर्शवत कोल्हे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दर्शविला. तसेच यावेळी कोल्हे यांनी जनसंपर्क कमी असला तरी मतदारसंघात झालेल्या कामाची माहिती दिली, त्यास सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

"शरद पवार यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी शिरूरमधून मला उमेदवार म्हणून ग्रीन सिग्नल देत शुभाशीर्वाद दिला आहे. २०१९ च्या निवडणुकीत मतदार विलास लांडे यांच्यासह संघातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मला चांगले सहकार्य केले. आगामी काळातही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. मी कला क्षेत्रात कार्यरत असल्याने थोडासा जनसंपर्क कमी झालेला होता.

Amol Kolhe
Mumbai : सात हजार सदनिका धारकांना पाणी टंचाईची झळ; रिजन्सी आनंतम मधील नागरिकांचा घसा कोरडाच

यापूर्वी ज्या कामासांठी मी शब्द दिला होता त्या पूर्ण करणे देखील आवश्‍यक असल्याने जनसंपर्क मी होता. गेल्या चार वर्षात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या बैलगाडा शर्यतीस मान्यता, पुणे नाशिक महामार्ग व इतर भागातील वाहतूक कोंडी सोडविण्याचे महत्त्वाचे काम झाले. आगामी काळातही मतदार संघात महामार्गांचे काम होणार आहे.

- अमोल कोल्हे, खासदार, शिरूर लोकसभा

जालनासाठी टोपेंच्या नावाचा आग्रह

जालना लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय वाघचौरे, चंद्रकांत दानवे हे इच्छुक उमेदवार असताना बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजेश टोपे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली.

Amol Kolhe
Mumbai : सात हजार सदनिका धारकांना पाणी टंचाईची झळ; रिजन्सी आनंतम मधील नागरिकांचा घसा कोरडाच

टोपे यांनी बैठकीत त्यास नकार देत इतरांना उमेदवारी द्यावी अशी भूमिका मांडली. त्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे बैठकीत ठरले आहे. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना टोपे यांनी काही हौशी कार्यकर्ते माझ्या नावाची चर्चा करत आहेत, पण मी जालन्यातून इच्छुक नाही असे सांगितले.

भिवंडीसाठी आत्ताच कोणी मागू नका

भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी दोघे तिघे इच्छुक आहेत. त्या पर्यायांवर चर्चा करण्यात आली. पण निर्णय झाला नाही. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, भिवंडीसाठी आत्ताच कोणी मला हा मतदारसंघ हवा अशी मागणी करू नका अशी स्पष्ट सूचना दिली आहे.

Amol Kolhe
Mumbai : सात हजार सदनिका धारकांना पाणी टंचाईची झळ; रिजन्सी आनंतम मधील नागरिकांचा घसा कोरडाच

‘‘शिरूर, जालना, भिवंडी या तीन मतदारसंघाची चर्चा झाली. बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी अमोल कोल्हे यांच्या नावाची शिफारस केली. जालना आणि भिवंडी येथेही इच्छुक आहेत. या नावाची महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ. लोकसभेसाठी सर्वच पक्ष तयारी करत आहेत. तो सर्वांना अधिकार आहे.’’

- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.