Dr. Ambedkar Jayanti : राज्यातील सर्व बुद्धविहारांमध्ये ‘१८ तास अभ्यास अभियान'

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कठोर परिश्रमाच्या बळावर आपण कोणतेही यश खेचून आणू शकतो, हे प्रत्यक्षात दाखवून दिले. बुद्धिमत्ता ही पुस्तक आणि ग्रंथांतून मिळते.
dr babasaheb ambedkar
dr babasaheb ambedkarsakal
Updated on
Summary

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कठोर परिश्रमाच्या बळावर आपण कोणतेही यश खेचून आणू शकतो, हे प्रत्यक्षात दाखवून दिले. बुद्धिमत्ता ही पुस्तक आणि ग्रंथांतून मिळते.

- डॉ. अरुण सोनकांबळे, हिंदी विभाग, किसनवीर महाविद्यालय, वाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कठोर परिश्रमाच्या बळावर आपण कोणतेही यश खेचून आणू शकतो, हे प्रत्यक्षात दाखवून दिले. बुद्धिमत्ता ही पुस्तक आणि ग्रंथांतून मिळते. हाच उद्देश ठेवून त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यासाठी राज्यातील सर्व बुद्धविहारांमध्ये ‘१८ तास अभ्यास अभियाना’चे आयोजन करण्यात येते.

अज्ञान, अंधकार, गुलामगिरीमध्ये वाट चुकून बसलेल्या समाजाला ज्ञान आणि प्रकाशाची वाट दाखवण्यासाठी १४ एप्रिल १८९१ मध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला. बालवयात शिक्षण घेत असताना त्यांना अस्पृश्य असल्याकारणाने वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागत असे. त्यांच्या बालमनावर असा परिणाम झाला की मी या समाजाला यातून बाहेर काढेन. विषम समाज व्यवस्थेचे समूळ नष्ट करण्यासाठी शिक्षण हा एकच राजमार्ग असल्याचे बाबासाहेबांच्या लक्षात आले, त्यांनी अनंत अडचणींवर मात करून एमए, पीएचडी, डीएससी, एलएलबी, डीलिट, बार-अट-लॉ अशा अनेक पदव्या संपादन केल्या. विविधतेने नटलेल्या स्वतंत्र भारताची राज्यघटनादेखील त्यांनी अथक परिश्रम करून लिहिली. जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून भारत राष्ट्राची ओळख आहे, याचे श्रेय बाबासाहेबांना जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण हे स्वतःसाठी घेतले का? तर नाही. मग त्यांचे शिक्षण आणि पदव्या या समाज आणि राष्ट्रासाठी वापरल्या. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण जे वाचन आणि लेखन आजपासून करणार आहोत, त्याचा उपयोग स्वतःबरोबरच समाज आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी केला तर एक आदर्श समाज तसेच राष्ट्र संपूर्ण जगासमोर राहील.

१८ तास अभ्यास हा उपक्रम चिंतनाचा, मंथनाचा, आत्मपरीक्षणाचा, चांगले करण्याच्या निर्धाराचा, शोषणमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, जणकल्याणाचा, सुसंवादाचा, माणसे जोडण्याचा, संवेदनशीलतेचा, करुणेचा, न्यायाचा, स्वाभिमानी व ऊर्जादायी असा मानवी प्रतिष्ठेचा, सद्‍गुणांचा, परिवर्तनाचा, बदल घडवून आणणारा आहे.

बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना ग्रंथालयातील पुस्तके वाचनाचा त्यांचा व्यासंग इतका होता की सकाळी ग्रंथालय उघडण्याच्या अगोदर आणि ग्रंथालय बंद होईपर्यंत अर्थात पहिले आणि शेवटचे विद्यार्थी हे बाबासाहेबच असायचे. त्यांना वाचन करत असताना मध्ये भूक लागली तर ते ब्रेड खात.

रिपब्लिकन विद्यार्थी परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदव्युत्तर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेली पंधरा वर्षे सलग १८ तास अभ्यास अभियान उपक्रम साजरा केला जातो. सतीश गायकवाड, अमोल सरवदे, डॉ. अरुण सोनकांबळे, प्रा. प्रज्ञानंद जोंधळे, सूर्यकांत गायकवाड, मिलिंद वाघमारे, बाबासाहेब सोनकांबळे, प्रा. मोहन कांबळे, जयकर गायकवाड, सागर सोनकांबळे, समाधान सरवदे, विजय कांबळे, बालाजी कांबळे आदींच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य ग्रंथालय इमारतीच्या मुख्य वाचनकक्षामध्ये कुलगुरूंच्या हस्ते याचे उद्‍घाटन केले जाते. १३ एप्रिलला रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी मेणबत्ती प्रज्वलित करून जयकर ग्रंथालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा असा मार्च काढून जयघोषात बाबासाहेबांना अभिवादन केले जाते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.