पुणे - 'वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो कसा? महापालिका प्रशासन झोपले होते का? वसतिगृहात मोकळी हवा, सूर्यप्रकाश ही येत नाही? विद्यार्थ्यांना जेवण नाही?' अशा खास ठाकरे स्टाईलने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी शनिवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विद्यार्थी मृत्यू व वसतिगृहातील सोयी सुविधानाबाबत विद्यार्थ्यांना समवेत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.