डॉ. अमोल कोल्हे यांचा कट्टर विरोधक आढळराव पाटील यांना फोन

दोघांमधील संभाषणाचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
Dr.Amol Kolhe
Dr.Amol KolheSakal
Updated on

कोरेगाव भीमा : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीप्रश्नी शिरुर लोकसभा मतदार संघात आजी-माजी खासदार व लोकप्रतिनिधींमध्ये नेहमीच राजकीय श्रेयवादासाठी जुगलबंदी दिसते. मात्र बैलगाडा शर्यतीचा प्रश्न (Question)साेडवण्यासाठी कुठलाही पक्षभेद, वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय आड न येता सर्वांनाच बरोबर घेऊन हा प्रश्न सोडवायचा, अशी स्पष्ट भूमिका घेत आज शिरुरचे (Shirur) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच फोन कॉल (Phone Call) करुन याप्रश्नी मार्गदर्शन व ओझर येथील बैठकीत सहभागी होण्याची विनंती करीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.(Pune News)

Dr.Amol Kolhe
बारामतीकरांनो, काळजी घ्या! पुन्हा निर्बंधाची वेळ आणू नका : अजित पवार

लोकसभा निवडणुकीसह (Election) वेळोवेळी संवेदनशील मुद्दा ठरलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबतच्या प्रत्येक घडामोडीत शिरुर लोकसभा मतदार संघात आजी-माजी खासदार बारकाईने लक्ष ठेवून असतात. तसेच त्याबाबतच्या प्रत्येक घडामोडी व त्यातील स्वत:चे योगदान माध्यमांसह सोशल मिडीयावरुनही त्वरीत मांडत असतात. कारण राजकारणात प्रत्येक मुद्दा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, कुठे ना कुठे श्रेयवादाशी जोडलेला असतो. मात्र अद्यापपर्यंत याप्रश्नी ठोस पर्यायच न निघाल्याने कोणालाच याचे श्रेय मिळु शकलेले नाही.

Dr.Amol Kolhe
कोरोनाच्या काळात बारामतीच्या डॉक्टरांनी केल एक वेगळ संशोधन

मात्र बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत नव्याने रणनिती आखण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आता वेगळाच पुढाकार घेतला आहे. बैलगाडा शर्यतबंदी विरोधात सर्वांचीच एकजूट दिसावी यासाठी त्यांनी सर्वच पक्षातील आजी-माजी खासदार, आमदार, प्रमुख बैलगाडा मालक संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी यांची वज्रमूठ बांधून याप्रश्नी लढा द्यायचा मनोदय केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी श्रेयवाद व राजकीय मतभेद बाजूला सारून थेट माजी खासदार शिवाजीदादांनाच फोन कॉल करून आपलंही मार्गदर्शन व्हावं, अशी विनंती करीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

Dr.Amol Kolhe
पुणे : वीरला आढळला डेल्टा प्लसचा रुग्ण

मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे शिवाजीदादा आढळराव यांनी सांगितल्याचेही डॉ. कोल्हे यांनी सोशल मिडीयावर टाकलेल्या व्हिडीओपाेस्टमध्ये नमुद केले आहे. मात्र नंतर आपली वेळ घेऊन आपल्याकडे चर्चेसाठी नक्की येतो, असेही त्यांनी म्हटले केले.राजकीय मतभेद बाजूला सारून थेट आजच्या बैठकीसाठी थेट शिवाजीदादा आढळराव यांनाच फोन कॉल करून याप्रश्नी आपलंही मार्गदर्शन मिळावं, असं सांगणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट करुन खासदार कोल्हे यांनी आपल्यातील मुत्सदीपणा तर दाखवलाच.

Dr.Amol Kolhe
पुणे शहरात डेल्टा प्लसचा पहिला रूग्ण

मात्र बैलगाडा शर्यती हा आपल्या दृष्टीने कुठल्याही श्रेयवादाचा विषय नसल्याने आपण पक्षभेद न बाळगता या बैठकींच्या निमित्ताने सामूहिक प्रयत्नांच्या दिशेने एक पाऊल टाकले असल्याचे सांगत हा प्रश्न सोडवण्यासाठी आपला पुढाकारही डॉ. कोल्हे यांनी बैलगाडाशौकींनांच्या मनात अधोरेखित केल्याची चर्चा रंगली आहे. आता सायंकाळच्या बैठकीत कार्य चर्चा होते तसेच खासदार डॉ. कोल्हे यांच्या प्रस्तावाला माजी खासदार शिवाजीराव आढळराव कसा प्रतिसाद देतात, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.