DRDO मध्ये नवी नियुक्ती; कुरुलकरांच्या जागी आता डॉ. मकरंद जोशी

Pradeep Kurulkar and Makrand Joshi
Pradeep Kurulkar and Makrand Joshi
Updated on

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या डीआरडीओ दिघे येथील संशोधन आणि विकास आस्थापना (अभियंता) या प्रयोगशाळेच्या संचालक पदी या प्रयोगशाळेचा संचालक पदाचा पदभार डॉक्टर मकरंद जोशी यांनी गुरुवारी स्वीकारला.

Pradeep Kurulkar and Makrand Joshi
Lok Sabha Election 2024: श्रीकांत शिंदेंना लोकसभेत चितपट करण्यासाठी राष्ट्रवादीकडून 'या' नावाची चर्चा

आर अँड डीईचे पूर्व संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोप असून या प्रकरणी दहशतवादविरोधी पथक (एटीएस)ने त्यांना अटक केली आहे. त्यानंतर संचालकपदाची जागा अद्याप रिक्त होती. मात्र आता डॉ. जोशी संचालक पदावर नियुक्त झाले आहेत.

डॉ. जोशी यांनी अमेरिकेतील क्लेमसन विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी प्राप्त केली आहे. ते ऑगस्ट २००० मध्ये आर अँड डीई (अभियंता) या प्रयोगशाळेत रुजू झाले. आर अँड डीईमध्ये विविध तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि उत्पादने विकसित करण्यामध्ये त्यांनी विशेष योगदान दिला आहे.

Pradeep Kurulkar and Makrand Joshi
Bharat Gaurav Train : तारीख ठरली! धार्मिकस्थळे दाखवणारी 'भारत गौरव ट्रेन' मुंबईतून धावणार

आर अँड डीई (अभियंता) ची स्थापना सहा दशकांपूर्वी करण्यात आली असून ही एक प्रमुख अभियांत्रिकी प्रयोगशाळा आहे. याद्वारे भारतीय सशस्त्र दलांसाठी विविध अभियांत्रिकी प्रणालींच्या स्वदेशी विकासावर भर देण्यात येत आहे. या प्रयोगशाळेद्वारे लष्करासाठी लढाऊ अभियांत्रिकी प्रणाली ही विकसित करण्यात आली आहे.

त्यामध्ये ब्रिजिंग सिस्टीम, विस्फोटक प्रणाली, लाँचर्स आणि ग्राउंड सपोर्ट सिस्टम आदींचा यात समावेश आहे. संमिश्र उत्पादने, रोबोटिक प्रणाली आणि मायक्रो-इलेक्ट्रो-मेकॅनिकल-सिस्टम्स (एमईएमएस) विकसित करण्याच्या क्षेत्रात ही प्रयोगशाळा अग्रगण्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.