केशवनगरमध्ये ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी पडून चालक जखमी

सात दिवसांपासून खड्डा खोदून ठेवला
जखमी दुचाकीस्वार
जखमी दुचाकीस्वारSakal
Updated on

मुंढवा - केशवनगर येथील मांजरी रस्त्यावरील तुकाई माता मंदीरासमोर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी ठेकेदाराने गेल्या सात दिवसांपासून खोदून ठेवलेल्या खड्यात, बुधवार, दि. १३ एप्रिल रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास प्रसाद कोतवाल हा युवक दुचाकीसह पडून खड्यात जखमी झाला. सुदैवाने हा थोडक्यात वाचला आहे. केशवनगर मांजरी हा वाहतुकीची वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरील काम दिवसरात्र तिथे उभे राहुन करून घ्यायला हवे असतांना, खड्डा खोदून ते काम सात दिवसांपासून बंद आहे.

ठेकेदाराने खड्याभोवती रेडियमच्या संरक्षक पाट्या लावल्या नव्हत्या. कोतवाल पहाटे दुध वाटपासाठी जात असतांना समोरून डोळ्यावर वाहनाचा प्रकाश पडला. त्यामुळे भर रस्त्यात खोदून ठेवले ला खड्डा त्याला दिसला नाही. त्यात तो पडून त्याच्या डोक्याला मार लागला व त्याला सहा टाके पडले आहेत. त्यात त्याच्या दुचाकी, मोबाइल तसेच दुधाचे बरेच नुकसान झाले आहे. या खोदाईस जबाबदार संबंधीत पालिका अधिकारी व ठेकेदार यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करून कोतवालला पालिकेने भरपाई द्यावी अशी मागणी रमेश राऊत यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.