Pune News : पुण्यातील ससूनमधून पळालेल्या ड्रग्स पेडलर प्रकरणी धक्कादायक माहिती समोर; पुणे पोलिसांनी...

drug peddler Lalit Patil sasoon hospital fugitive escape shocking information cctv footage
drug peddler Lalit Patil sasoon hospital fugitive escape shocking information cctv footage
Updated on

अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या ललित अनिल पाटील या कैद्याने सोमवारी रात्री ससून रुग्णालयातून पलायन केले होते. त्यानंतर आता हा पळून गेलेल्या ड्रग्स पेडलर प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेल्याचे रुग्णालय प्रशासन आणि येरवडा कारागृह प्रशासनाला पुणे पोलिसांनी कळवलच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयातून ललित पाटील पळून गेल्यानंतर तब्बल दीड तासानंतर पुणे पोलिसांनी प्रशासनाला माहिती याबद्दलची माहिती दिली. तसेच पोलिसांनी आरोपीचा पाठलाग देखील केला नसल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे.

drug peddler Lalit Patil sasoon hospital fugitive escape shocking information cctv footage
Cloud Burst in Sikkim : सिक्किममध्ये ढगफुटीमुळे प्रलय! पुरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता, शोध मोहिम सुरू

दरम्यान आरोपी पळून जातानाचे ससून रुग्णालयाच्या आवारातील आणि रस्त्यांवरील सीसीटीव्ही चित्रीकरण देखील ताब्यात घेतले आहे. २ ऑक्टोबर रोजी ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेला. यानंतर या घटनेला जबाबदार असणारे एक पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी असे ९ जणांचे निलंबन करण्यात आलं आहे.

या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पोलिसांकडून तपास केला जात आहे. या अमली पदार्थ तस्करीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात असून त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

drug peddler Lalit Patil sasoon hospital fugitive escape shocking information cctv footage
‘कलम ४२ ब’ माहितीय का? रहिवासी वापराची जमीन होणार बिनशेती; अपार्टमेंटमधील फ्लॅट नावावर नसल्यास ‘हा’ आहे पर्याय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()