Chandrakant Patil: मद्यपी चालकाने ताफ्यातील गाडीला दिली धडक, थोडक्यात वाचले चंद्रकांत पाटील

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चार चाकी चालकाने जोरदार धडक दिली.
Chandrakant Patil
Chandrakant Patil
Updated on

पुणे- भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चार चाकी चालकाने जोरदार धडक दिली. चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले आहेत. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये रात्री हा अपघात झाला आहे. चंद्रकांत पाटील गणपतीच्या दर्शनासाठी आज पुण्यात होते. यावेळी एका मद्यपी वाहन चालकाने त्यांच्या ताफ्यातील वाहनाला धडक दिली आहे. यात गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचं कळतंय. सुदैवाने चंद्रकांत पाटील यातून बचावले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.