गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्यासह इतरांवर सुरू असलेला खटला अंमलबजावणी संचालनालयाकडे वर्ग करण्यात आला.
पुणे - गुंतवणूकदारांची (Investor) कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) (DSK) यांच्यासह इतरांवर सुरू असलेला खटला अंमलबजावणी संचालनालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी मुंबईत आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) (PMLA) न्यायालयात होणार आहे.
या गुन्ह्यात सुरू असलेल्या सर्व खटल्याची सुनावणी एकाच ठिकाणी होऊन प्रकरण निकाली काढण्यासाठी प्रकरण वर्ग करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी दिला आहे. डीएसके प्रकरणात सुमारे ३५ हजार गुंतवणूकदारांची एक हजार १०० कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक झाली आहे. या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोषारोपपत्रही दाखल केले आहे. डीएसके, पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई यांच्यासह अनेकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. येथील महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण (एमपीआयडी) न्यायालयात गुंतवणूकदारांची फसवणूक (एमपीआयडी) कायद्यानुसार सुनावणी सुरू होती. तसेच हे प्रकरण र्इडीमध्ये देखील दाखल आहे. त्यामुळे आता मुंबईत एमपीआयडी आणि ईडी दोन्ही प्रकरणांची सुनावणी मुंबईत सुरू राहणार आहे.
डीएसके प्रकरण पुणे सत्र न्यायालयातून मुंबई येथे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी व्हावी, अशा प्रकारचे पत्र ईडीने मुंबई येथील ईडीच्या सत्र न्यायालयात दिले होते. त्यानुसार पुढील सुनावणी आता मुंबईत होणार आहे. पुढील तारीख १७ फेब्रुवारी आहे.
- ॲड. प्रवीण चव्हाण, डीएसके प्रकरणातील विशेष सरकारी वकील
आरोपींच्या अटकेला चार वर्षे उलटल्यानंतर खटला वर्ग होणे धक्कादायक आहे. आता ईडी न्यायालयात एकच न्यायाधीश ईडी आणि एमपीआयडीनुसार दावा चालविणार आहेत. त्यातून गुंतवणूकदारांचे हित कसे साधले जाणार असा प्रश्न आहे. यातील १२ पैकी केवळ चार आरोपींवर ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीमध्ये साक्षीदार असलेले एमपीआयडीमध्ये आरोपी आहेत. ठेवीदारांना लवकरात लवकर न्याय मिळणे गरजेचे आहे.
- ॲड. आशिष पाटणकर आणि ॲड. प्रतीक राजोपाध्ये (डीएसके प्रकरणातील बचाव पक्षाचे वकील)
हा निर्णयामुळे गुंतवणूकदारांचे हित साधले जात नाही. एमपीआयडी कायदा हा गुंतवणूकदाराच्या हिताचा आहे. त्यामुळे हा खटला ईडी न्यायालयात वर्ग केल्यास ठेवीदारांना पैसे कसे मिळणार हा प्रश्न आहे.
- ॲड. चंद्रकांत बिडकर, ठेवीदारांचे वकील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.