पुणे - डीएसके ग्रुपच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्यात, यासाठी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात येणार आहे. ठेवी परत देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. ठेवी परत न मिळाल्यास आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठेवीदारांच्या वतीने बुधवारी (ता.१४) पत्रकार परिषदेत देण्यात आला.