Pune News: शेतकऱ्यांनी भूमिगत विद्युत वाहिनीचे काम पाडले बंद, जाणून घ्या काय आहे कारण

Haveli News: दोन्ही गावचे ग्रामपंचायत प्रशासन, स्थानिक कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कारवाई केली
  शेतकऱ्यांनी भूमिगत विद्युत वाहिनीचे काम पाडले बंद, जाणून घ्या काय आहे कारण
Pune News:sakal
Updated on

Manjari Khurda : कोलवडी - मांजरी खुर्द व वाघोली (ता. हवेली) (haveli taluka)रस्त्याने एका खाजगी बांधकाम व्यवसायिकासाठी सुरू असलेले भूमिगत विद्युत वाहिनीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रोखण्यात आले आहे.

दोन्ही गावचे ग्रामपंचायत प्रशासन, स्थानिक कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कारवाई केली आहे. थेऊर (ता. हवेली) येथील विद्युत वितरण केंद्रातून मांजरी खुर्द येथे विकसित होत असलेल्या एका मोठ्या गृहप्रकल्पासाठी परिसरातून जाणाऱ्या रस्त्यालगत चर खोदून ही भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यात येत आहे.

  शेतकऱ्यांनी भूमिगत विद्युत वाहिनीचे काम पाडले बंद, जाणून घ्या काय आहे कारण
Pune Crime News : कोंढव्यातील पिकासो पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये किरकोळ वादातून जादूटोण्याचा प्रकार

मात्र विद्युत वितरण कंपनीने सार्वजनिक मांजरी खुर्द व कोलवडी या दोन्ही ग्रामपंचायती तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने हे काम सुरू केले होते. कोलवडी - मांजरी खुर्द रस्ता व मांजरी खुर्द वाघोली रस्त्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून ठिकठिकाणी खोदकाम करून वाहिनी टाकली जात आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याशिवाय रस्त्याची ही मोठ्या प्रमाणात खराबी झाली आहे.

या कामासाठी विद्युत वितरण कंपनी व गृहप्रकल्पाने खुदाई करताना संबंधित शेतकरी व ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेतले नाही. बेकायदेशीर व अशास्त्रीय पद्धतीने होत असलेल्या या कामामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

असा आरोप कोलवडी येथील शेतकरी कार्यकर्ते रवींद्र गायकवाड, अशोक गायकवाड, जयसिंग गायकवाड, काळूराम गायकवाड, विजय गायकवाड यांनी केला आहे. येथील शेतकऱ्यांनी आमदार अशोक पवार यांची भेट घेऊन त्याबाबत तक्रार केली आहे. दरम्यान, आमदार पवार यांनी ग्रामस्थांच्या शंकेचे निरसन होईपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत वितरण कंपनीला हे काम बंद करण्यास सांगितले आहे.

  शेतकऱ्यांनी भूमिगत विद्युत वाहिनीचे काम पाडले बंद, जाणून घ्या काय आहे कारण
Pune Crime News : कोंढव्यातील पिकासो पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये किरकोळ वादातून जादूटोण्याचा प्रकार

"ग्रामपंचायत व स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम करण्यास परवानगी दिली आहे. विद्युत वितरण कंपनीकडून होत असलेल्या खोदाईमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व रस्त्याचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय खुदाई करताना प्रवाशांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली गेलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत हे काम आम्ही बंद पाडले आहे.'

रुपेश उंदरे पाटील

सरपंच, मांजरी खुर्द (ता. हवेली)

" सार्वजनिक बांधकाम विभागाने विद्युत वितरण कंपनीला विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामासाठी परवानगी दिली आहे. मात्र लोकप्रतिनिधी स्थानिक शेतकरी व ग्रामपंचायत प्रशासनाने या कामावर आक्षेप घेतल्याने ते तूर्त थांबविण्यात आले आहे.'

जान्हवी रोडे

सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग हवेली

  शेतकऱ्यांनी भूमिगत विद्युत वाहिनीचे काम पाडले बंद, जाणून घ्या काय आहे कारण
Pune Traffic News: महामार्गावर उड्डाणपुलाच्या कामामुळे मोठी वाहतुक कोंडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com