Pune: गुन्हा दाखल झाल्यानंतर 'डुप्लिकेट CM विजय माने'ची पहिली प्रतिक्रिया

Vijay Mane
Vijay ManeSakal
Updated on

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा हुबेहुब दिसणारा पुण्यातील विजय माने या तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत गुंड शरद मोहोळ याच्यासोबतचा त्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप विजय मानेंवर केला गेला होता. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकारावर विजय माने या तरूणाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

(Duplicate CM Vijay Mane First Reaction After Case File)

दरम्यान, विजय माने हा हुबेहुब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसत असल्यामुळे तो पुण्यात चर्चेत होता. त्यानंतर त्याचा शरद मोहोळ यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून "मी शरद मोहोळ यांना ओळखत नाही, मी भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी असून इंजिनिअर आहे, मी असं काम कधीच करणार नाही. लोकांकडून माझे फोटो व्हायरल करण्याचा प्रयत्न केला जात आहे" अशी प्रतिक्रिया विजय माने याने व्यक्त केली आहे.

Vijay Mane
धक्कादायक! कुत्र्याने मटण खाल्ल्यामुळे वडिलांनी केली पोटच्या मुलीची हत्या

"हा फोटो कधी आणि कुणी काढला हे मला माहितीही नाही, त्याचबरोबर या फोटोसंदर्भात मी पोलिसांत सुद्धा गेलो होतो. पण आता मला या प्रकरणात अडकवण्यात येत आहे. मी समाजासाठी हे काम करतोय पण मला बदनाम केलं जातंय. मी मोहोळ यांना ओळखत नाही तर माझी राजकीय वाटचाल खाली आणण्यासाठी माझ्यावर असे आरोप केले आहेत" अशी खंत विजय माने याने व्यक्त केली आहे.

"मी सर्वसामान्य घरातला व्यक्ती असून मी कधी चुकीचं काम केलं नसून अन्य कुणीही असं काम करू नये असं मी आवाहन करत असतो. पण मग सामान्य घरातील व्यक्तीने पुढे जायचं नाही का असा प्रश्न मला पडला आहे" अशी खंत विजय माने याने गुन्हा दाखल झाल्यावर व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.