#nightcurfew: पुणे शहरात कर्फ्यूचं स्वरुप कसं असणार? महापालिकेनं दिली माहिती

Corona_Curfew
Corona_Curfew
Updated on

#nightcurfew: पुणे : पुण्यासह राज्यभरातील महापालिकांच्या हद्दीत मंगळवारपासून (ता.२२) रात्रीच्या वेळी म्हणजे, रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे, पण पुण्यातील दिवसभरातील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत राहणार आहेत.

त्याचवेळी सकाळी ६ नंतर रात्री ११ वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडी असतील. परंतु, संचारबंदीच्या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर ये-जा करता येणार नाही. त्याचवेळी गर्दी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मंगळवारपासून संचारबंदी लागू केली आहे. मात्र, त्याबाबतच शहरानुसारचा आदेश उद्या दुपारपर्यंत निघेल, त्यामुळे संचारबंदीच्या काळात नागरिकांवर कोणत्या मर्यादा येणार हेही स्पष्ट होणार आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीबाबतचा पुणे महापालिकेचा आदेश मंगळवारी निघू शकतो, असेही सांगण्यात आले.

पुण्यासह विविध शहरात गेल्या काही दिवसांपूस कोरोनाची साथ कमी होत असल्याचे आकडे येत आहेत. पुण्यातही आता दुसऱ्या लाटेची शक्यता नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने सर्वत्र नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे, अशा परिस्थितीत ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडल्याने सर्वत्र पुन्हा प्रचंड भीती पसरली आहे.

या विषाणुमुळे सर्वत्र संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आहे, खबरदारी म्हणून रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, दिवसभरातील व्यवहारांवर त्याचा परिणाम होणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आले. पुणे शहरात संचारबंदीचे स्वरुप या काळात नेमके काय सुरू राहील आणि काय बंद राहणार, कोणत्या कामांसाठी लोकांना घराबाहेर येता येईल, याची स्पष्टता असणारा आदेश उद्या निघण्याची शक्यता महापालिका प्रशासनाकडून वर्तविणयात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.