बारामती (Baramati) : आजपर्यंत तुम्ही नेहमी साथ दिली आहे. तुम्ही लोकसभेला गंमत केली आता विधानसभेला गंमत करू नका. नाहीतर तुमची जम्मत होईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवार) बारामतीत केले. Rohit Pawar : थापेबाज सरकारला हाकलून लावा : रोहित पवार.Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'.विधानसभा निवडणुकीत बारामतीमधून अजित पवार निवडणूक लढवित असून, त्यांच्याविरोधात पुतण्या युगेंद्र पवार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवित आहे. बारामतीतील चार गावांच्या दौऱ्यावर अजित पवार असून, पानसरेवाडी येथे त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एक कार्यकर्ता अजित पवारांना म्हणाला, प्रतिभाकाकींचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. यावर अजित पवारांनी असलं प्रेम मला नको, असे उत्तर दिले आहे..Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?.अजित पवार म्हणाले, घरातील दोन उमेदवार उभे राहिले आहेत. लोकसभेला जो निकाल दिला त्याबाबत माझं काही म्हणणं नाही. पण, आता गंमत केली तर जम्मत करेल. ठेकेदारने खराब काम केलं तर दोष मलाच मिळतो. महिलांना आधी पुरुष मंडळी पैसे द्यायचे आणि हिशेब मागायचे. आता हिशेब द्यायची गरज नाही. साहेब म्हणाले मी रिटायर होणार आहे. त्यामुळे पुढचे कोण बघणार आहे हे तुम्हाला माहित आहे. भावनिक होऊ नका. साहेबांचा फोटो लावला आहे. साहेबांची ही निवडणूक नाही ना? कधी प्रतिभा काकी बाहेर आल्या का? काय नातवाचा पुळका आलाय काय माहिती? मी काय गंजाडा, पिताडा आहे का? मी बारामती तालुक्याची वाट लावली का? मी टीका करायला गेलो तर तो आहे माझा पुतण्या. मी टीका करायला गेलो की घरातल्या घरात कसे काढायचं? परत असं केलं तर नाभिक समाज नाराज होईल. मी निवडणूक झाल्यावर काकींना विचारणार आहे की, एवढा पुळका का होता?Maharashtra Election: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? जागतिक गुंतवणूकदाराने वर्तवलं भाकित.'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा.लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा आता कमी दिवस राहिले आहेत. या गावात सुनेत्राला 30 टक्के मते आणि सुप्रियाला 60 टक्के मते होती. यावेळेस चांगल्या पद्धतीने मतदान करावं ही विनंती आहे. पानसरेवाडीतील लोकांना जाऊन नमस्कार करावा म्हणून मी आलोय. मी ज्यांना पदे दिली तेच माझ्या विरोधात गेले. तरुणांनो मला यावेळी साथ द्या, मी तुम्हाला संधी देतो. बारामतीत अनेक निवडणुका लढवल्या पण चुकीचे पायंडे बारामतीत पडत आहेत. गाफील राहू नका. तुलना करू नाही पण, साहेबांपेक्षा माझ्या कारकिर्दीत जास्त कामे झाली, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.Ratnagiri Assembly Election : शिवसेनेची हक्काची मते कोणाला मिळणार? ठाकरे की शिंदे? रत्नागिरीत मोठी चुरस.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.