मी केवळ दोन वर्षांपूर्वी हॉंगकॉंगमधून भारतामध्ये ‘शॉपिफाय’ या कंपनीची प्रमुख म्हणून दाखल झाले. मला अमेरिकेमध्येच काम करण्याचा दहा वर्षांचा अनुभव होता व तेथे स्वावलंबनाची (डू इट युवरसेल्फ) जीवनपद्धती अवलंबण्याची सवय होती. भारतामधील माझी सुट्टी मात्र अगदी लाडामध्ये गेली व कारण येथे सर्व काही हातात मिळत (डन फॉर मी) होते.
मी भारतात ‘शॉपिफाय’चा विस्तार केल्यानंतर मला लक्षात आले की, येथे व्यवसाय किंवा उत्पादनवृद्धी करायची असल्यास आपल्याला भारतीयांची ही मानसिकता विचारात घेणे आवश्यक आहे. भारत एक ‘डू इट फॉर’ मी देश आहे. हे मी देशातील शहरी लोकांबद्दल बोलत नाही, ते ‘डू इट युवरसेल्फ’मधील काही गोष्टींचा आनंद लुटतात. मी देशाच्या एकुणात असलल्या मानसिकतेबद्दल बोलत आहे.
हेही वाचा : 'प्रो वकील'मुळे खटला लढणे सोपे!
आपण आपल्या आयुष्यात डोकावून पाहिल्यास ड्रायव्हिंग, घरकाम, मुलांची देखभाल या अमेरिकेत ऐषोआरामाच्या समजल्या जाणाऱ्या गोष्टी भारतात सहज उपलब्ध होतात. किराणा दुकानदार आपल्या घरात इ-कॉमर्सची घरपोच सेवा सुरू होण्याआधीपासून सामान आणून देत होता व भाजीवाला आपल्या दारात येऊन भाजी विकत होता. आपला माळी आपल्याला घरातील बागेची देखभाल करण्यासाठी मदत करीत होता. या सर्वांचे मूळ भारतात या गोष्टी आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारख्या आहेत, हे असेल तरी त्यापलीकडे ते आणखी काहीतरी आहे, जे खूप आतवर रुजलेले आहे.
त्यामुळे कोणत्याही मोठ्या उद्योगाने, बहुराष्ट्रीय कंपनीने भारतात प्रवेश करण्याआधी अनेक व्यवसायिक दृष्टिकोन डोक्यात ठेवणे गरजेचे असते.
उदाहरणार्थ, ‘शॉपिफाय’मध्ये सुरवातीला कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) ही सेवा दिली जात नव्हती. काही काळाने ‘शॉपिफाय’ने ती केवळ भारतातील व्यापाऱ्यांना उपलब्ध करून दिली. व्यवस्थापनाला या सेवेचे अनन्यसाधारण महत्त्व समजण्यास काही कालावधी जावा लागला आणि त्यात काही आश्चर्य नाही! आम्ही भारतीय एकमेवाद्वितीय आहोत. नोटाबंदीनंतरच्या काळातही ही सेवा सुरुच राहिली आणि तसे करण्यामागे अनेक कारणे असली, तरी त्यांचा उल्लेख मी या लेखात करणार नाही.
ग्राहकांसाठी ‘पेमेंट गेट-वे’च्या एकत्रिकरणासारख्या गोष्टी आवश्यक होत्या. आम्ही स्थानिकांच्या मदतीने भारतीयांना विविध स्थानिक भाषांमध्ये सेवा देण्यासाठी टीम तयार केल्या. आम्ही व्यावसायिकांशी अनेकदा व सातत्याने चर्चा केल्यानंतर ही सेवा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे दिसून आले. ‘शॉपिफाय’कडे सध्या स्थानिक ग्राहकांच्या मदतीसाठी टीम उपलब्ध नाही, मात्र माझ्या दृष्टिने, भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषांमुळे येणारी बंधने दूर करण्यासाठी स्थानिक भाषा येणाऱ्यांची टीम आवश्यक आहे. त्याचबरोबर कंपनीसाठी विविध बेवसाइट व ऑनलाईन प्लॅटफॉर्म हाताळणारे प्रत्येक वेळी त्या कंपनीचे मालकच असतात, असेही नाही.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शेवटी, कोणतीही साईट विकसित करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या हातांची, थेट मदतीची गरज असते. हे काम तपशीलाने बनवलेले, प्रत्येक पायरीची माहिती देणारे गाईड किंवा डिजिटल ट्युटोरिअल्स किंवा वर्कशॉप करु शकत नाहीत. आमच्याकडे ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीच्या उत्पादनासाठी ‘डू इट फॉर मी’ पद्धतीच्या टीम आहेत!
ते या सेवेसाठी पैसे मोजायला तयार आहेत, मात्र हे तंत्र सोपे असूनही त्यांची शिकण्याची इच्छा नाही. त्याचे एक कारण, लोकांना तंत्रज्ञानासारख्या गोष्टींची थोडी भीती वाटते.
त्यामुळेच केवळ बिझनेस टू बिझनेस (बी२बी) व्यवसायांसाठीच नव्हे, तर अमेझॉन व फर्निचर रिटेलर ‘आयकेईए’सारख्या अनेक बिझनेस टू कस्टमर (बी२सी) कंपन्यांनाही फक्त भारतासाठी काही सेवांची तरतूद करणे भाग पडले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.