बारामतीत ई एस आय सी हॉस्पिटलबाबत विचार करू - भूपेंद्र यादव

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांची पुण्यात भेट घेत बारामती मध्ये ई एस आय सी हॉस्पिटल मंजूर करणे बाबत प्रस्ताव दिला.
Baramati Hospital
Baramati HospitalSakal
Updated on

बारामती : बारामती इंडस्ट्रियल मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन यांनी बारामतीला केंद्र शासन राज्य कामगार विमा मंडळाचे 200 बेडचे हॉस्पिटल मंजूर करण्यासाठी दिलेल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करू असे आश्वासन केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार महादेव गायकवाड, अभिजीत शिंदे यांना दिले. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांची पुण्यात भेट घेत बारामती मध्ये ई एस आय सी हॉस्पिटल मंजूर करणे बाबत प्रस्ताव दिला. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, कामगार आयुक्त सुरेश जाधव, भारत फोर्जचे संतोष भावे आदी उपस्थित होते.

बारामतीच्या शंभर किलोमीटर परिघात राज्य कामगार विमा मंडळाचे हॉस्पिटल नसल्याने सदर कामगार वर्ग हक्काच्या वैद्यकीय सुविधेपासून वंचित राहत आहेत. 2016 पासून ई एस आय सी बारामती परिसरातून विमा शुल्क वसूल करत आहे, वैद्यकीय सुविधा मात्र उपलब्ध करुन देत नसल्याने औद्योगिक कंपन्या व कामगारांवर अन्याय होत आहे. सदर हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक कामगार संख्या, एम आय डी सी कडून उपलब्ध होउ शकणारी जागा, उत्तम पायाभूत सुविधा, बारामती हे मध्यवर्ती ठिकाण या बाबी यादव यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे जामदार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()