पर्यटनासाठी प्रियमचा 'कमवा आणि फिरा' मंत्र

आंब्यांच्या विक्रीतून जमविले पैसे; अनुभवांचे गाठोडे झाले समृद्ध.
earn and travel
earn and travelSakal Media
Updated on

पुणे ः नारायणपेठेत राहणाऱ्या अठरा वर्षाच्या प्रियम राठीला पर्यटनाची व भटकण्याची भारी हौस. दुसऱ्या लॉकडाउनपुर्वीच तीने एप्रिल-मे मध्ये फिरण्यासाठी जाण्याचा मनसुबा तिच्या बाबांना सांगितला. बाबांनी मात्र मागील लॉकडाऊन नंतर आलेल्या आर्थिक मर्यादा समजवत पैसे देण्यास नकार दिला. पण हिरमुसलेल्या प्रियमला त्यांनी 'कमवा आणि फिरा' हा कानमंत्र दिला. मग काय प्रियमने चक्क स्वबळावर आंब्याची हंगामी विक्री सुरू केली आणि बघता बघता गेल्या अडीच महिन्यात तिने २६० पेट्यांची विक्री केली.

earn and travel
पुणे : महापालिकेच्या 65 केंद्रांवर लसीकरण

पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या प्रियमला अगदी लहानपणापासून पर्यटनाची आवड. वडीलांच्या बरोबर तिने राजस्थान, कश्मीर, हिमालय, पूर्वांचल आदी ठिकाणी प्रवास केला आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोनाचे सावट कमी झाल्यावर तीने फिरण्याचा बेत आखला पण त्यास लागणारा पैसा आंब्याच्या व्यवसायातून उभारण्याचे ठरविले. तिचे वडील सत्येंद्र राठी म्हणतात, ''फळांच्या व्यवसायाशी खरं तर घरातील कोणाचा दुरान्वयेही संबंध नव्हता. तिच्यासाठी सारेच नवे होते. तिने फळांच्या व्यापारीकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला; पण धंद्याची गुपितं कोणीही सांगत नसल्याचे तिच्या निदर्शनास आले. ती थोडी हताश ही झाली; पण एक परिचित नील नायर आणि संगीता लड्डा यांनी मात्र मदत करत, तिला थेट कोकणच्या हापूस आंबे व्यापाऱ्यांशी जोडून दिले.'' हापूसचा पुरवठा करणारे राजेश जैन यांनी आंब्याच्या व्यवसायातील खाच खळगे, बाळगावी लागणारी दक्षता, आंब्यांच्या जाती इत्यादी बद्द्ल किमान पण आवश्यक अशी माहिती तिला दिली.

लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रियमने मग सोशल मीडिया अर्थात फेसबुक, व्हाट्सअप, इंस्ट ग्राम इत्यादीचा वापर करण्याचे ठरविले. प्रियम नावाशी साधर्म्य दाखविणारा 'प्रिय आम' नावाने तिने व्यवसायास सुरवात केला. तिने घरोघरी जाऊन आंबे पोहचवले, यात तिला चुलत भाऊ आदित्य राठीने मदत केली.

earn and travel
पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५३७४ जणांना डिस्चार्ज तर ६४१ नवीन रुग्ण

या सगळ्या उठाठेवीचा उपयोग तिला व्यवहार ज्ञान समजण्यास उपयोगी ठरला. ग्राहकांना हाताळणे शिकता आले. ग्राहकांशी सख्य कसे ठेवावे याची जाण आली. हिशोबाची समज आली. वेळेची किंमत समजली. एकूण काय तर केवळ नफ्याचीच नव्हे तर अनुभवाची झोळीही भरू लागली.

- सत्येंद्र राठी, प्रियमचे वडील

फिरायला नेताना बाबा मुद्दामहून रेल्वेने प्रवासाला प्राधान्य देतात. कारण तिथले लोक आणि संस्कृतीशी जवळीक निर्माण होते. विविधतेने नटलेल्या आपल्या देशभर

पर्यटन करण्याची माझी आवड आहे. या हंगामी व्यवसायातून कदाचित मी फार नफा कमविला नसेल. पण लोकांशी संवाद साधून मी जी जीवनमूल्ये शिकले ती जास्त महत्त्वाची आहेत.

- प्रियम राठी

earn and travel
कोरोनामुळे पुणे पालिकेच्या अकरा कर्मचाऱ्यांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.