पुणे - शिक्षणामुळे केवळ आपली संस्कृती आणि सभ्यता उभी राहीली नाही. तर भविष्यातील मानवतेला आकार देण्याचे काम शिक्षण करत आहे. म्हणूनच ई-लर्निंगच उद्दिष्ट्ये केवळ उत्तम प्रशासन नाही तर दर्जेदार शिक्षण असले पाहीजे.
डिजिटल तंत्रज्ञान सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देत असून, त्यामुळे शैक्षणिक प्रवेशात सुलभता येते आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. गुरुवारी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी पुण्यातील जी-२०च्या शैक्षणिक कार्यगटातील प्रतिनिधींनी संवाद साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘शिक्षणमंत्री खऱ्या अर्थाने आधुनिक शेर्पा आहेत. जे मानवसमूहाला सर्वांसाठी विकास, शांतता आणि समृद्धीच्या प्रवासासाठी दिशा दाखवत आहेत. भारताने आता सर्वसमावेशक आणि सर्वांगीण शिक्षणाच्या प्रवासाकडे वाटचाल सुरु केली आहे.
पायाभूत साक्षरता किंवा अक्षरओळख विद्यार्थ्यांच्या विकासाचा पाया मजबूत करणारी असते आणि भारत त्याला आता तंत्रज्ञानाचीही जोड देत आहे.’ केंद्र सरकारने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली. त्यात ‘‘स्टडी वेब्स ऑफ अॅक्टिव लर्निंग फॉर यंग अॅसपायरिंग माइंडस’ किंवा स्वयं ह्या ऑनलाईन शिक्षणमंचाचा त्यांनी उल्लेख केला.
या मंचावर इयत्ता नववी ते पदव्युत्तर स्तरापर्यंत विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शिक्षणाची सहज उपलब्धता, समानता आणि उत्तम दर्जाचे सर्वांना शिक्षण यावर भर देण्यात यश आले आहे, असे ते म्हणाले.
दक्षिणेतील देशांना मदत करणार...
‘स्वयं’ प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत नऊ हजार पेक्षा अधिक अभ्यासक्रम उपलब्ध असून, त्यासाठी ३ कोटी ४० लाख मुलांनी नोंदणी केली असल्याची माहिती मोदी यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘ज्ञानाच्या देवघेवीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा महत्त्वपूर्ण असून, दीक्षा पोर्टलचे उद्दिष्ट, दूरस्थ पद्धतीने शालेय शिक्षण देणे हे आहे.
या पोर्टलवरुन २९ भारतीय आणि सात परदेशी भाषांमधून शिक्षण दिले जाते. आजवर त्यावरून एक कोटी ३७ लाख लोकांनी अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.’’ इतर देशांना, विशेषतः ग्लोबल साऊथ देशांना, आपले अनुभव, ज्ञान आणि संसाधने यांची मदत देण्यास भारत आनंदाने तयार आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
मोदी म्हणाले...
- आपल्या युवकांना सतत आणि नव्याने कौशल्याधारीत प्रशिक्षणासाठी सज्ज करणे गरजेचे
- सरकार कौशल्य मॅपिंग कार्यक्रम हाती घेत असून, शिक्षण, कौशल्य आणि कामगार मंत्रालये यावर एकत्रितपणे काम करतात
- देशभरात दहा हजार ‘अटल टिंकरिंग लॅब’द्वारे शाळकरी मुलांसाठी संशोधन आणि नवोन्मेषाच्या संगोपनशाळा म्हणून काम केले जाते
- जी-२० गटाने शाश्वत विकासाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हरित संक्रमण, डिजिटल परिवर्तन आणि महिला सक्षमीकरण यांना चालना दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.