पुणे - महापालिकेने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुणेकरांसाठी खास उपक्रम राबविला आहे. नागरिकांनी पीओपीच्या मूर्ती घेण्यापेक्षा शाडू मातीची मूर्ती घ्यावी यासाठी ‘मूर्ती आमची, किंमत तुमची’ हा उपक्रम हाती घेतला आहे. घोले रस्ता आर्ट गॅलरीमध्ये शुक्रवारी (ता.६) व शनिवारी (ता.७) सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत मूर्ती उपलब्ध असणार आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.