Eco Friendly Ganpati : शाडूच्या गणेश मूर्ती खरेदीला वाढतेय मागणी

पर्यावरणपूरकचे आवाहन : मूर्तिकारांना शाडू माती उपलब्ध करून देण्याची गरज
ganesh murti
ganesh murti sakal
Updated on

पिंपरी - पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात होते, ती पर्यावरणपूरक गणेशमूर्तीपासून. ‘पीओपी’च्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण, गणेश सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण या गोष्टी टाळण्यासाठी पर्यावरपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन दरवर्षी प्रशासन, सामाजिक संस्था यांच्याकडून केले जाते.

त्यानुसार अनेकजण शाडूच्या मूर्तींना पसंती देताना दिसत आहेत. मात्र, पीओपी व शाडू मातीच्या मूर्तींचे उत्पादन, मागणी व खरेदीचा कल पाहता; यंदाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती विकत घेण्याकडेच गणेशभक्तांची संख्या तुलनेने जास्त आहे. गणेशोत्सव पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे.

ganesh murti
Mumbai: धारावी झाली चकाचक, महिनाभरात महापालिकेने हटवला ६०० टन कचरा

त्यामुळे ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्रेत्यांची दुकाने सजू लागली आहेत. आपल्या आवडीची मूर्ती बुक करण्यासाठी भक्तांचीही लगबग सुरू झाली आहे. पण शहरातील मूर्ती विक्रेत्यांमध्ये ‘पीओपी’च्या मूर्ती विक्रेत्यांची संख्या पाहता शाडूच्या मूर्ती विक्रेत्यांची संख्या अगदीच कमी आहे.

शाडू मातीच्या मूर्तींबाबत नागरिकांमध्ये अद्याप पुरेशी जागरूकता नाही. अनेकदा विक्रेते शाडू मातीच्या मूर्ती म्हणून पीओपीच्या मूर्तींची विक्री करतात. शाडूच्या मूर्ती महाग असल्याने अनेकदा नागरिकांचे तेवढे पैसे खर्च करण्याची तयारी नसते. त्यामुळे नागरिकांचा कल पीओपीच्या मूर्तींकडे जास्त असतो, असे मूर्तिकारांनी सांगितले.

ganesh murti
Pune News : पुनर्वसनाठी घेणार जागांचा शोध; पथारी व्यावसायिकांचे पुणे महापालिका करणार बायोमेट्रिक सर्वेक्षण

उत्पादनाची खर्चिक प्रक्रिया

पीओपीच्या तुलनेत शाडू मातीची मूर्ती घडविण्यासाठी अधिक वेळ लागतो. ही माती गुजरातच्या नर्मदा खोऱ्यातून आणली जाते. साहजिकच पीओपीच्या तुलनेत या मूर्तीचे उत्पादन कष्टाचे व खर्चिक आहे.त्यामुळे या मूर्ती महाग असल्याचे मूर्तिकार सांगतात. त्यामुळे शाडू मातीच्या अगदी पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यासाठी अनेकदा प्रशासन केवळ चर्चा करते. मात्र, घोषणा होत नाही.

ganesh murti
Satara News : सातारा जिल्ह्यासह कराड मध्येही बंदला प्रतिसाद

या मूर्तिकारांना जर शाडू माती उपलब्ध करून दिली तर साहजिकच उत्पादन वाढेल. मागणी वाढली की मूर्तींच्या किंमती कमी होतील. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर यावर विचार होणे आवश्‍यक आहे.

प्रीतम थोरात, मूर्तिकार व विक्रेते

पर्यावरणपूरक मूर्ती न होण्याची कारणे ?

पीओपीच्या गणेशमूर्तींचे बाजारात विक्रीसाठी अधिक प्रमाण

‘पीओपी’च्या तुलनेत शाडू मातीच्या मूर्तींच्या जास्त किमती

शाडूची मूर्ती कशी ओळखावी याबाबत असणारा माहितीचा अभाव

शाडूच्या मूर्तीच्या नावाखाली ‘पीओपी’च्या मूर्तींची केली जाणारी विक्री

नागरिकांमध्ये शाडू मातीच्या मूर्ती घेण्याबाबत असलेली उदासीनता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.