अविनाश भोसलेंच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात; मुंबईत चौकशी सुरु

ED took in custody of Avinash Bhosale son for enquiry
ED took in custody of Avinash Bhosale son for enquiry
Updated on

पुणे : नामांकीत बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकल्यानंतर भोसले यांचा मुलगा अमित भोसले यास ताब्यात घेतले आहे. अमित भोसले यांना चौकशीसाठी ईडीच्या पथकाने मुंबईला नेले आहे.

अविनाश भोसले हे बांधकाम व्यावसायिक व हॉटेल व्यावसायिक आहेत. तसेच ते "एबीआयएल ग्रुप"चे मालकही आहेत. परकिय चलनाच्या कारणावरुन "एफईएमए" कायद्याअंतर्गत अविनाश भोसले यांची मागील काही महिन्यापासुन ईडीकडुन चौकशी सुरु आहे. नोव्हेंबर 2020 मध्येही त्यांची चौकशी झाली होती.याबरोबरच आयकर विभागानेही भोसले यांच्या पुणे व मुंबई येथील कार्यालयावर छापे घातले होते.

 दरम्यान बुधवारी सकाळी ईडी"च्या मुंबई विभागच्या अधिकाऱ्यानी भोसले यांच्या कार्यालयावर बुधवारी सकाळी छापे टाकले. त्यानंतर सकाळपासून सुरु असलेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. त्यानंतर ईडीने अमित भोसले यास ताब्यात घेऊन पुण्याहून मुंबईला नेले असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.