पुणे : खाद्यतेलाचे भाव गेल्या वर्षभरात सातत्याने वाढत असून, १५ किलोच्या डब्यामागे साधारणतः ८०० ते १००० रुपयांची त्यामध्ये वाढ झाली आहे. मात्र, मागील पंधरा दिवसात २०० रुपयांनी भावात घट झाली आहे. कडक निर्बंध, विवाह समारंभ, हॉटेल, केटरिंग, खाणावळी बंद आहेत. त्यामुळे पुणे, मुंबईसह देशातून ३० ते ४० टक्क्यांनी खाद्यतेलाची मागणी घटली आहे, त्याचा हा परिणाम आहे.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दळणवळणावर मर्यादा आल्या आहेत. व्यवहार बंद झाले आहेत. त्याचा व्यापारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तेलाच्या खरेदीविक्रीवरही परिणाम झाल्याचे चित्र असल्याचे तेलाचे व्यापारी रायकुमार नहार यांनी सांगितले.
तेलाचे प्रकार - मे २०२० - एप्रिल २०२१ - मे २०२१
सूर्यफूल रिफाईंड ः १५४० ते १६०० - २५०० ते २७०० - २३०० ते २५००
सोयाबीन ः १३४० ते १४४० - २४०० ते २५०० - २३०० ते २४००
सरकी तेल ः १३२० ते १४१० - २५५० - २४५०
वनस्पती ः १००० ते १२०० - १८५० ते २१०० - १८०० ते २०३०
पाम तेल ः १२३० ते १३१०- २२०० - २०५०
शेंगदाणा ः १६५० - २७५० - २६३०
सत्तर टक्के तेल आयात
भारतात दरवर्षी एकूण मागणीच्या सुमारे ७० टक्के खाद्यतेलाची आयात केली जाते तर देशात मागणीच्या ३० टक्के खाद्यतेलाची निर्मिती केली जाते. केंद्र सरकारचे तेलावरील आयात शुल्क जास्त आहे. त्यामुळे खाद्यतेलांच्या दरवाढीवर मोठा परिणाम झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.